7th Pay Commission DA : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. ही अपडेट आहे त्यांच्या महागाई भत्ता वाढीच्या बाबतीत. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो.
सरकारी नोकरदार मंडळींना दरवर्षी जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. जानेवारी महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा साधारणता मार्च महिन्यात घेतला जातो. दरवर्षी होळी सणाच्या आसपास याबाबतचा निर्णय होत असतो.
![7th Pay Commission DA](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/7th-Pay-Commission-DA.jpeg)
यंदा देखील मार्च महिन्यात जानेवारी 2025 पासून चा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय. आता जानेवारी 2025 पासून हा महागाई भत्ता 56% किंवा 57% इतका होणार आहे.
दरम्यान आता आपण जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 56% होणार की 57% म्हणजेच यामध्ये तीन टक्क्यांची वाढ होणार की चार टक्क्यांची याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
आकडेवारी काय सांगते?
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासून 53% दराने महागाई भत्ता दिला जातोय. त्याआधी हा महागाई भत्ता 50% इतका होता. म्हणजे जुलै 2024 पासून या भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
आता जानेवारी 2025 पासून ची महागाई भत्ता वाढ ही एआयसीपीआयची जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील आकडेवारीनुसार ठरणार आहे. दरम्यान आत्तापर्यंत जुलै ते नोव्हेंबर 2024 या कालावधी मधील एआयसीपीआयची आकडेवारी समोर आली आहे.
या आकडेवारीवर जर नजर टाकली तर यावेळी सुद्धा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच महागाई भत्ता यावेळी 57% होणार नाही तर 56% एवढाच होण्याची शक्यता आहे.
पण अजून डिसेंबर महिन्याच्या आकडेवारी बाकी आहे. यामुळे जेव्हा डिसेंबर महिन्याचे आकडेवारी समोर येईल तेव्हाच अधिकृत रित्या महागाई भत्ता किती वाढणार हे स्पष्ट होणार आहेत.
परंतु नोव्हेंबर महिन्यापर्यंतची आकडेवारी पाहिली असता यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता नाहीये आणि यावेळी सुद्धा महागाई भत्ता तीन टक्क्यांनीच वाढणार असे म्हटले जात आहे. महागाई भत्ता हा जानेवारी 2025 पासून 56% इतका होणार आहे. मात्र याबाबतचा निर्णय मार्च 2025 मध्ये होईल.