Share Market मध्ये मोठा भूकंप! झटक्यात झाला गुंतवणूकदारांच्या सात लाख कोटींचा चुराडा.. कारण की…

शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे तब्बल ७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी बीएसई सेन्सेक्स ८६२.९ अंकांनी घसरून ७५,४३०.७० वर पोहोचला. तर निफ्टी २५७.३ अंकांनी घसरून २२,८१४.५० वर बंद झाला. हे सलग सहावे सत्र आहे जिथे भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे.

Ratnakar Ashok Patil
Published:

Share Market Collapse:- शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे तब्बल ७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी बीएसई सेन्सेक्स ८६२.९ अंकांनी घसरून ७५,४३०.७० वर पोहोचला. तर निफ्टी २५७.३ अंकांनी घसरून २२,८१४.५० वर बंद झाला. हे सलग सहावे सत्र आहे जिथे भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे.

लहान आणि मध्यम आकाराच्या शेअर्समध्येही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. तर रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवली गेली. गेल्या सहा सत्रांमध्ये सेन्सेक्सने २,८०० हून अधिक अंक गमावले आहेत. तर निफ्टी जवळपास ९०० अंकांनी घसरला आहे. या मोठ्या घसरणीमागे पाच प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

या घसरणीमागील प्रमुख कारणे

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या नवीन टॅरिफ निर्णयांमुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता वाढली आहे. युरोपियन युनियनने या टॅरिफच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रत्युत्तरादाखल शुल्क लागू करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर व्यापार युद्धाची भीती निर्माण झाली आहे.

ज्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला आहे. तज्ज्ञांच्या मते जर अमेरिकेत महागाई वाढली तर फेडरल रिझर्व्ह अधिक कठोर आर्थिक धोरण स्वीकारू शकते. ज्यामुळे संपूर्ण जागतिक बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कंपन्यांचे कमकवत निकाल

याशिवाय डिसेंबर तिमाहीतील काही प्रमुख कंपन्यांचे कमकुवत निकालही बाजारातील घसरणीला जबाबदार ठरले आहेत. बर्जर पेंट्स, गोपाल स्नॅक्स आणि आयशर मोटर्स यांसारख्या कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा कमी होते. त्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झाला आहे.

स्मॉलकॅप आणि मिडकॅप समभागांमध्येही गेल्या दोन महिन्यांपासून मोठी विक्री सुरू असून निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक डिसेंबरच्या उच्चांकाच्या तुलनेत २०% खाली गेला आहे.तर निफ्टी मिडकॅप निर्देशांक सप्टेंबरच्या उच्चांकाच्या तुलनेत १८% घसरला आहे.

परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा सपाटा

यासोबतच परदेशी गुंतवणूकदारांनी (FII) मोठ्या प्रमाणावर भारतीय शेअर बाजारातून पैसे काढले आहेत. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत त्यांनी १७,१२९.५३ कोटी रुपयांची विक्री केली आहे.

तर जानेवारी महिन्यात त्यांनी जवळपास ७८,०२७ कोटींची गुंतवणूक मागे घेतली होती. रुपयाच्या घसरणीमुळे परदेशी गुंतवणूकदारांचे भारतीय बाजारावरील विश्वासार्हता कमी होत आहे. ज्याचा परिणाम संपूर्ण बाजाराच्या कामगिरीवर दिसून येत आहे.

गुंतवणूकदारांना तज्ञांचा सल्ला

तांत्रिक विश्लेषणानुसार निफ्टीने सलग पाच दिवस मंदीचा कॅंडलस्टिक पॅटर्न दर्शवला आहे. जो कमकुवतपणाचे संकेत देतो. तज्ज्ञांच्या मते, २२,९७० ची पातळी महत्त्वाची आहे.जर निफ्टी त्याखाली गेला तर पुढील घसरण २२,५०० पर्यंत जाऊ शकते.

वरच्या बाजूला २३,१८० आणि २३,३५० वर प्रतिकार स्तर आहेत. यामुळे गुंतवणूकदारांनी अधिक सावधगिरी बाळगावी आणि जास्त किमतीच्या समभागांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी मजबूत कंपन्यांच्या लार्जकॅप समभागांकडे वळावे असा सल्ला बाजार विश्लेषकांनी दिला आहे.

एकूणच जागतिक अस्थिरता, कमकुवत तिमाही निकाल, स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्सचे उच्च मूल्यांकन, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि तांत्रिक घसरण ही पाच प्रमुख कारणे भारतीय शेअर बाजाराच्या मोठ्या घसरणीमागे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील काही दिवस बाजारात अस्थिरता राहू शकते.त्यामुळे गुंतवणूकदारांनी काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe