PM किसान 19 वा हप्ता लवकरच ! शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ₹22,000 कोटी जमा होणार

Published on -

PM Kisan Samman Nidhi Yojana : देशातील ९.८ कोटी शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने PM किसान सन्मान निधी योजनेच्या १९व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. २४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट २,००० रुपये जमा केले जातील. या योजनेच्या माध्यमातून एकूण २२,००० कोटी रुपये देशभरातील पात्र शेतकऱ्यांना वाटप केले जातील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील भागलपूर येथील एका कार्यक्रमात १९वा हप्ता जारी करतील, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. PM किसान योजना ही जगातील सर्वात मोठी डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) योजना आहे, जी शेतकऱ्यांसाठी मोठा आधार बनली आहे.

९.८ कोटी शेतकऱ्यांना दिलासा 

या योजनेंतर्गत देशभरातील ९.८ कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी ₹२,००० मिळणार असून, एकूण ₹२२,००० कोटी थेट त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत माहिती दिली.

वार्षिक ₹६,००० चा लाभ

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी ₹६,००० वार्षिक मदत मिळते, जी चार महिन्यांच्या अंतराने ₹२,००० च्या तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाते. आतापर्यंत ₹३.४६ लाख कोटी रुपये या योजनेतून वितरित करण्यात आले आहेत.

२४ फेब्रुवारीला मोठा कार्यक्रम

हा १९वा हप्ता जारी करण्यासाठी बिहारच्या भागलपूर येथे विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात बिहारचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संबंधित केंद्रीय मंत्री उपस्थित असतील. यावेळी सुमारे २.५ कोटी शेतकरी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभागी होणार आहेत.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सरकारचे प्रयत्न

सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी कटिबद्ध आहे. नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी पीएम किसानसारख्या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जात आहे.

पीएम किसान योजना – जगातील सर्वात मोठी डीबीटी योजना

फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू झालेली पीएम किसान योजना जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) योजना आहे. या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि शेतीच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत मिळत आहे.

२४ फेब्रुवारीला आपल्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का, यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची तपासणी करावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe