रेशनकार्डधारकांसाठी राज्य सरकारकडून मोठी बातमी समोर आली आहे. स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी सरकार वेळोवेळी काही ना काही खास सुविधा जाहीर करत असते. विधानसभा निवडणुकीनंतर अनेकांना वाटत होतं की, सरकार कधी मोठी घोषणा करणार? आता त्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला असून, सरकारने अंत्योदय रेशनकार्डधारक महिलांना साडी देण्याचा निर्णय घेतला आहे. होळीच्या सणानिमित्त ही भेट दिली जाणार असल्याने अनेक कुटुंबांसाठी आनंदाचा क्षण ठरणार आहे.
अंत्योदय योजनेअंतर्गत मोफत साडी वाटप
मागील वर्षी राज्य सरकारने अंत्योदय योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच पद्धतीने यंदाही लाभार्थींना साडी वाटप करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील सुमारे ४४,१६० महिला आणि पुणे जिल्ह्यातील ४८,८७४ महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

सरकारच्या पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानातून येत्या होळीपर्यंत या साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना त्यांच्या कुटुंबासाठी एक विशेष भेट मिळणार आहे.
किती महिलांना लाभ मिळणार?
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली असून, पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक महिलांना लाभ दिला जाणार आहे. तालुक्यानुसार साडी लाभार्थ्यांची यादी खालीलप्रमाणे आहे: बारामती – ७,९७५ दौंड – ७,२२२ जुन्नर – ६,८३८ पुरंदर – ५,२८५ आंबेगाव – ५,१३७ इंदापूर – ४,४५३ शिरूर – ३,९९० खेड – ३,२१८ भोर – १,९०९ मावळ – १,५३६ मुळशी – ५४० हवेली – २५१ या सर्व तालुक्यांतील लाभार्थी महिलांना रेशन धान्यासोबत मोफत साडी मिळणार आहे.
दिवाळीपेक्षा मोठा सण!
अंत्योदय योजनेअंतर्गत रेशनकार्डधारक महिलांना मिळणारी ही मोफत भेट म्हणजे एका प्रकारे होळीच्या सणानिमित्त सरकारकडून गिफ्टच मिळणार आहे, ग्रामीण भागातील महिला योजनेचा लाभ घेत असल्याने त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. स्वस्त धान्य योजनेतून धान्य मिळत असतानाच आता महिलांसाठी साडी वाटपाचा निर्णय सरकारने घेतल्याने हा एक मोठा फायदा ठरणार आहे.
होळीच्या पूर्वी वाटप
रेशनकार्डधारकांसाठी अंत्योदय योजनेतून साडी वाटप हा एक सकारात्मक निर्णय आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो गरीब आणि गरजू महिलांना थोडासा आनंद मिळणार आहे. योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. होळीच्या पूर्वी हे वाटप पूर्ण होईल, त्यामुळे लाभार्थींनी साडी घेताना ती तपासून घ्यावी आणि योजनेचा लाभ घ्यावा.
चुका टाळण्यासाठी विशेष खबरदारी
गेल्या वर्षीही या योजनेअंतर्गत राज्य सरकारने महिलांना साडी वाटप केले होते, मात्र काही ठिकाणी वाटप झालेल्या साड्या फाटक्या आणि निकृष्ट दर्जाच्या असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. यामुळे अनेक महिलांचा हिरमोड झाला होता. यंदा अशा चुका होऊ नयेत यासाठी सर्व लाभार्थींनी साडी घेताना ती नीट तपासून घ्यावी. स्वस्त धान्य दुकानातच साडी नीट तपासून घ्या. साडी निकृष्ट असेल किंवा दोष असेल, तर त्वरित तक्रार करा पुरवठा विभागाकडून गुणवत्तेची तपासणी केली जाणार आहे. मागील वर्षी राज्य सरकारने एका साडीच्या खरेदीसाठी ३५५ रुपये मोजले होते. यंदा देखील साडी वाटपासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. स्थानिक स्तरावर स्वस्त धान्य दुकानांमार्फत साड्यांचे वितरण केले जाणार आहे.