Dividend Stock : सध्या भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे मात्र या घसरणीच्या काळात गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी अशा गुंतवणूकदारांसाठी अधिक खास करणार आहे जे गुंतवणूकदार बोनस शेअर्स, डिव्हीडेंड देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक राहतात.
खरंतर सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांकडून आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची आणि डिव्हीडेंड देण्याची घोषणा केली जात आहे. ऑटोमोटिव्ह कंपोनंट सप्लायर सीआयई ऑटोमोटिव्ह इंडियाने आपल्या शेअर होल्डर्ससाठी लाभांश देण्याची घोषणा केली आहे.

या कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 7 रुपये अंतिम लाभांश दिला जाणार आहे. संचालक मंडळाच्या 20 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे यासाठीची रेकॉर्ड डेट सुद्धा निश्चित करण्यात आली आहे.
रेकॉर्ड डेट कोणती आहे ?
सीआयई ऑटोमोटिव्ह इंडियाने डिव्हीडेंड देण्यासाठी रेकॉर्ड डेट 23 एप्रिल 2025 निश्चित केली आहे. याचा अर्थ या तारखेपर्यंत कंपनीच्या रेकॉर्ड बुक मध्ये ज्या शेअर होल्डर्सचे नाव राहणार आहे, त्यांनाच या डिविडेंडचा लाभ दिला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे कंपनी वेळोवेळी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देत आली आहे. सीआयई ऑटोमोटिव्ह इंडियाने याआधी 2022 मध्ये प्रति शेअर 2.50 रुपये, 2023 मध्ये 2.50 रुपये आणि 2024 मध्ये प्रति शेअर 5 रुपये अंतिम लाभांश देण्यात आला होता.
शेअरची सध्याची स्थिती कशी आहे?
21 फेब्रुवारी 2025 रोजी हा स्टॉक 421 रुपयांवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या मार्केट कॅपिटल बाबत बोलायचं झालं तर सध्याचे मार्केट कॅप हे 15900 कोटी रुपये इतके आहे. गेल्या काही काळापासून या कंपनीची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. या कंपनीचे स्टॉक गेल्या सहा महिन्यात 24 टक्के घसरलेत. तसेच गेल्या दोन आठवड्यात या स्टॉक मध्ये अकरा टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे.