मेट्रो ३ च्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यावर येथील भुयारी मार्ग चाचणी सुरू !

Published on -

२८ फेब्रुवारी २०२५ वरळी : कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ च्या बीकेसी ते आचार्य अत्रे चौक वरळी या भुयारी दुसऱ्या टप्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले असून, भुयारी स्थानकांदरम्यान चाचणी सुरू असल्याची माहिती एमएमआरसीएलने दिली आहे.यापूर्वी मेट्रो ३ च्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत कफ परेडपर्यंत मेट्रो सुरू करण्याचे विचाराधीन होते. मात्र, आता दुसऱ्या टप्प्याची दोन टप्प्यांत विभागणी करण्यात आली असून, टप्पा २ अ आचार्य अत्रे चौक वरळीपर्यंत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तर रेल्वेच्या सुरक्षा प्रमाणपत्रासाठी मेट्रो चाचण्या महत्त्वाच्या ठरणार आहेत.बीकेसी ते वरळी या दुसऱ्या टप्प्यांतर्गत ६ स्थानकांचा समावेश आहे. धारावी मेट्रो स्थानक ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यान मेट्रो चाचण्या सुरू असून, मिठी नदीखालून मेट्रो धावत आहेत.

भुयारी मार्गादरम्यान चाचण्यांना सुरुवात होणार आहे.चाचण्या यशस्वी झाल्यानंतर मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने स्पष्ट केले आहे.

मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होऊन महिना उलटून गेल्यानंतर वरळी आचार्य अत्रे चौक पर्यंतच्या दुसऱ्या टप्याची लगबग सुरू केली आहे. बीकेसी ते कुलाब्यादरम्यान गिरगावमधील भुयारी काम पूर्ण करणे अत्यंत आव्हानात्मक असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते.दाटीवाटीच्या परिसर, जुन्या इमारती, सातत्येन वाहतूक यामुळे काम पूर्ण करण्यास विलंब होत आहे.

मात्र, येत्या काही महिन्यात म्हणजेच मार्च पर्यंत २ अ चे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तर मे २०२५ पर्यंत २ ब अर्थात कुलाब्यापर्यंत सर्व मेट्रो चाचण्या पूर्ण करून लोकार्पण करण्यात येणार आहे.मेट्रो ३ मार्गासाठी ३७ हजार २७६ रुपये खर्च झाले असून, जापनीज बँकेने अर्थसहाय्य केले आहे.

त्यामुळे केवळ तिकिटांवर अवलंबून न राहता इतर माध्यमातून महसूल मिळवण्यासाठी एमएमआरसीएलने तयारी केली आहे.मेट्रो स्थानकांचे नावाचे बँडिंग, तसेच संवाद प्रणाली, जाहिराती यांच्याबरोबरच मेट्रो स्थानकातील जागा व्यवसाय स्वरूपात भाड्याने देण्याचे नियोजन एमएमआरसीएलने केले आहे.

सध्या विविध स्थानकांमध्ये एकूण १.५ लाख चौ. फूट जागा व्यावसायिक स्वरूपात उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.ही जागा भाड्याने देऊन महसूल उपलब्ध करण्यात येणार आहे.

टप्पा २ ची स्थानके

धारावी, शीतलादेवी माहीम, दादर, सिद्धिविनायक, वरळी, आचार्य अत्रे चौक.

टप्पा २ ब ची स्थानके

वरळी सायन्स सेंटर, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन, कफ परेड.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe