8th Pay Commission : सध्या संपूर्ण देशात एका गोष्टीची विशेष चर्चा आहे अन ती गोष्ट म्हणजे 8 वा वेतन आयोग. 8 वा वेतन आयोगाची कमिटी कधी स्थापन होणार, कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार, फिटमेंट फॅक्टर काय असणार, कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात नवीन आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत अन याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. अशातच, आता 8वा वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
काय आहेत डिटेल्स ?
सरकारने यावर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली. तारीख 17 जानेवारी 2025, या दिवशी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची आठवा वेतन आयोगाची मागणी मान्य केली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आठवा वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. वेतन आयोग जाहीर झाला खरा पण अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी आहे.
आठव्या वेतन आयोगाची घोषणा झाली असली तरी अद्याप आठवा वेतन आयोगाच्या कमिटीची स्थापना कधी होणार याबाबत कोणतीच अपडेट हाती आलेली नाही. म्हणून आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना कधी होणार ? याची उत्सुकता लागली आहे.
पण सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून 1 जानेवारी 2026 पासून प्रत्यक्षात नवा वेतन आयोग लागू होईल, असा दावा करण्यात आला आहे. म्हणूनच आज आपण आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना नेमकी कधी होणार हे समजून घेणार आहोत.
कधी होणार समितीची स्थापना?
प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होतो. सध्याचा सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला होता अन यामुळे एक जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे. मात्र आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी त्याच्या समितीची स्थापना होणे आवश्यक आहे.
सातवा वेतन आयोगाबाबत बोलायचं झालं तर सप्टेंबर 2013 मध्ये त्याची घोषणा झाली होती आणि फेब्रुवारी 2014 मध्ये सातवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झाली आणि पुढे एक जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग प्रत्यक्षात सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला.
सहावा वेतन आयोगाबाबत बोलायचं झालं तर जुलै 2006 मध्ये त्याची घोषणा झाली आणि ऑक्टोबर 2006 मध्ये त्याच्या समितीची स्थापना झाली. पाचवा वेतन आयोगाची घोषणा एप्रिल 1994 मध्ये झाली आणि पुढील दोन महिन्यात म्हणजे जून 1994 मध्ये त्याच्या समितीची स्थापना झाली.
एकंदरीत पाचवा, सहावा, सातवा वेतन आयोगात दोन महिन्यांपासून ते पाच महिन्याच्या काळात समितीची स्थापना करण्यात आली आहे. यानुसार जून 2025 पर्यंत आठवा वेतन आयोगाच्या समितीची घोषणा होणार असल्याचा दावा होऊ लागला आहे. तसेच 1 जानेवारी 2026 पासून प्रत्यक्षात वेतन आयोग लागू होणार आहे.