नववी पर्यंतच्या सर्व विध्यार्थ्यांच्या परीक्षा एकाच वेळी घेण्यास शिक्षकांचा विरोध

Published on -

७ मार्च २०२५ नाशिक : राज्यातल्या सगळ्या शाळेतील परीक्षांचे आयोजन एकाच वेळी आणि सुटसुटीत असावे यासाठी पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकाच वेळी घेण्याचे परिपत्रक शिक्षण संचालनालयाने काढले असून यानुसार पहिली ते नववीच्या परीक्षा ८ ते २५ एप्रिल पर्यंत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्याच प्रकारे १ मे ला निकाल लावण्याचे आदेशसुद्धा दिले आहेत.

पण या निर्णयामुळे शिक्षकांवर अन्याय होत असल्याने शिक्षक संघटनांनी यास विरोध केला आहे.राज्यातल्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी २०२४-२५ मध्ये वार्षिक परीक्षा आणि संकलित चाचणी २ चे (नियतकालिक मूल्यांकन चाचणी) वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.त्यानुसार ८ ते २५ एप्रिल या काळात या परीक्षा घेतल्या जातील.

राज्यातल्या सगळ्या शाळांच्या वार्षिक परीक्षा एकाच वेळी घेण्यात याव्यात, अशा सूचना शिक्षण उपसंचालक (प्रशासन) रजनी रावडे यांनी दिल्या आहेत. राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये एकवाक्यता असावी आणि उपलब्ध वेळेचा उपयोग विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी व्हावा,त्यासाठी शाळांमध्ये वर्ष अखेरीस घेण्यात येणारे मूल्यमापन एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात करण्याचे ठरले आहे.

याला अनुसरून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ आणि २ अशा तीन चाचण्या घेण्यात येणार आहे. सुधारित
वेळापत्रकानुसार पहिली व दुसरीच्या परीक्षा २३ ते २५ एप्रिल, तिसरी ते चौथीच्या २२ ते २५ एप्रिल, पाचवीच्या परीक्षा ९ ते २५ एप्रिल, सहावी ते सातवीच्या परीक्षा १९ ते २५ एप्रिल, आठवीच्या परीक्षा ८ ते २५ एप्रिल, नववीच्या परीक्षा ८ ते २५ एप्रिल दरम्यान घेण्यात येतील तसेच राज्यातल्या सगळ्या शाळेच्या परीक्षेचा निकाल १ मे रोजी ध्वजवंदनानंतर जाहीर केला जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe