HDFC Personal Loan EMI : आपल्याला पैशांची गरज भासली की आपण सर्वप्रथम बँकेचे दरवाजे ठोठावत असतो. बँका आपल्या ग्राहकांना सहजतेने वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देतात आणि हेच कारण आहे की इमर्जन्सी मध्ये पैशांची गरज भासली की आपण बँकेत जात असतो.
देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक म्हणजेच एचडीएफसी बँक देखील आपल्या ग्राहकांना अगदी सहज रित्या आणि कमी डॉक्युमेंटमध्ये वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देते. दरम्यान , आज आपण एचडीएफसी बँकेच्या पर्सनल लोन ची माहिती पाहणार आहोत.

एचडीएफसी बँकेकडून तीन लाखांचे पर्सनल लोन घेतल्यास किती रुपयांचा ईएमआय भरावा लागणार याचे कॅल्क्युलेशन देखील आज आपण थोडक्यात समजून घेणार आहोत.
एचडीएफसी बँकेचे पर्सनल लोनचे व्याजदर
इतर कर्जांच्या तुलनेत वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर हे थोडेसे अधिक असतात. वैयक्तिक कर्ज हे नॉन सेक्यूअर कर्जाच्या कॅटेगिरी मध्ये येते. यामुळे या कर्जासाठी बँकांकडून अधिकचे व्याज वसूल केले जाते.
एचडीएफसी बँक बाबत बोलायचं झालं तर सध्या प्रायव्हेट सेक्टरमधील ही लीडिंग बँक आपल्या ग्राहकांना किमान 10.85% इंटरेस्ट रेट वर पर्सनल लोन उपलब्ध करून देत आहे.
मात्र बँकेच्या किमान व्याजदराचा फायदा फक्त त्याच लोकांना मिळतो ज्यांचा सिबिल स्कोर हा स्ट्रॉंग आहे. 800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या लोकांना बँकेकडून किमान व्याजदरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
तीन लाखांचे पर्सनल लोन घेतल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार?
एचडीएफसी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या पर्सनल लोन कॅल्क्युलेटर नुसार, जर समजा एखाद्या ग्राहकाला किमान 10.85% इंटरेस्ट रेटवर तीन वर्षांसाठी तीन लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज उपलब्ध झाले तर सदर ग्राहकाला 9800 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
या काळात संबंधित ग्राहकाला व्याज आणि मुद्दल असे एकूण तीन लाख 52 हजार 800 रुपये बँकेला द्यावे लागणार आहेत. म्हणजेच तीन वर्षात ग्राहकाला एकूण 52 हजार आठशे रुपयांचे व्याज बँकेला द्यावे लागणार आहे.
मात्र, बँक आपल्याला कोणत्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देते यावरच कर्जाचा हप्ता ठरणार आहे. तसेच इतर कर्जाप्रमाणेच वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात देखील बँकेकडून वेळोवेळी बदल होत असतो. व्याजदरात बदल झाल्यानंतर कर्जाचा हप्ता देखील कमी जास्त होत असतो.