Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्या संपूर्ण देशात होळी सणाची धूम पाहायला मिळत आहे. 14 मार्च 2025 रोजी देशात होळीचा मोठा सण साजरा होणार असून या अनुषंगाने सध्या सर्वत्र मोठे उत्साहाचे वातावरण आहे. होळी सणासाठी अनेक जण आपल्या मूळ गावी परतत आहेत. पुण्याहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या देखील फारच मोठी आहे.
मात्र पुण्याहून कोकणात जाताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. खरे तर सध्या पुण्याहून कोकणात जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध नाही.

अशावेळी मग प्रवाशांना मुंबई मार्गे कोकणात जावे लागते पण मुंबई मार्गे धावणाऱ्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि यामुळेचं पुण्यातील रेल्वे प्रवाशांकडून पुणे ते कोकण अशी थेट रेल्वे सेवा सुरू झाली पाहिजे अशी मागणी या निमित्ताने उपस्थित करण्यात आली आहे.
दरम्यान आता याच संदर्भात कोकण विकास समितीने पाठपुरावा सुरू केला असून कल्याणमार्गे पुणे ते सावंतवाडी विशेष रेल्वेगाडी सुरु करावी अशी मोठी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन देखील रेल्वे कडे देण्यात आले आहे.
दरम्यान ही विशेष गाडी सुरू झाल्यास होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे, मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवरील ताण कमी होऊन पुणे आणि कोकण दरम्यानची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे, असे कोकण विकास समितीने म्हटले आहे.
खरे तर याआधी सुद्धा पुणे ते कोकण दरम्यान विशेष गाडी चालवण्यात आली आहे आणि या विशेष गाड्यांना प्रवाशांकडून भरभरून प्रतिसाद सुद्धा मिळाला आहे. हेच कारण आहे की, होळी सणाच्या अनुषंगाने सुद्धा पुणे ते सावंतवाडी दरम्यान स्पेशल गाडी सुरू केली जाऊ शकते, असे विकास समितीने सांगितले आहे.
दरम्यान आता आपण पुणे ते सावंतवाडी दरम्यान विशेष ट्रेन सुरू झाल्यास या गाडीला कोणकोणत्या स्थानकावर थांबा मंजूर होऊ शकतो याचा आढावा घेऊयात.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळू शकतो?
खरे तर पुणे ते सावंतवाडी यादरम्यान विशेष गाडी चालवण्याची कोणतीच घोषणा अजून रेल्वेने केलेली नाही. मात्र रेल्वे बोर्ड लवकरच या संदर्भात निर्णय घेईल अशी आशा आहे. दरम्यान जर ही गाडी सुरू झाली तर या विशेष गाडीला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर केले जाणार आहेत.
या मार्गावरील चिंचवड – तळेगाव – लोणावळा – कर्जत – कल्याण – पनवेल – पेण – रोहा – माणगाव – वीर – सापे वामने – करंजाडी – खेड – चिपळूण – सावर्डा – अरावली रोड – संगमेश्वर रोड – रत्नागिरी – आडवली – विलावडे – राजापूर रोड – वैभववाडी रोड – नांदगाव रोड – कणकवली – सिंधुदुर्ग – कुडाळ – झाराप या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा राहू शकतो अशी माहिती समोर येत आहे.