‘वंदे भारत ‘मधून सीएसएमटी-शिर्डी प्रवास सुसाट ! दीड महिन्यात ६७ हजार १९६ प्रवाशांचा प्रतिसाद

Published on -

१५ मार्च २०२५ मुंबई : महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या बहुचर्चित वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये सीएसएमटी – शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमधून गेल्या दीड महिन्यात ६७ हजार १९६ प्रवाशांनी सुसाट प्रवास केला असून, या एक्स्प्रेसची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे.

१० फेब्रुवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडले. दोन वर्षे सुसाट प्रवास करणाऱ्या या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी लाखो भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. या भाविकांना वंदे भारत एक्स्प्रेसचा मोठा आधार मिळत असून, सुरक्षित आणि वेगवान प्रवास याद्वारे घडत आहे.

दरम्यान, वंदे भारत ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणून १५ फेब्रुवारी २०१९ मध्ये पहिली वंदे भारत ट्रेन रूळावर आली. अलीकडेच वंदे भारत एक्स्प्रेसला ६ वर्षे पूर्ण झाली. आलिशान आणि उच्च दर्जाच्या सोयीसुविधांसह देशभरात आतापर्यंत ५० हून अधिक वंदे भारत एक्स्प्रेस रुळांवर धावत असून, या ट्रेन्सची निर्मिती देखील जलदगतीने सुरू आहे. या ट्रेनमुळे देशाच्या दळणवळण क्षेत्रात कमालीची क्रांती घडली आहे.अशातच साईनगर शिर्डी या ट्रेनमुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळ जलद गतीने जोडले गेल्याने भाविकांसाठी पर्वणी ठरत आहे.

सीएसएमटी-शिर्डी वंदे भारत प्रवासी आकडेवारी

फेब्रुवारी – २५,९३२
मार्च – ७,४९६
एकूण – ३३,४२८

शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत प्रवासी आकडेवारी

फेब्रुवारी – २५,१७४
मार्च – ८,५९४
एकूण – ३३,७६८

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe