१५ मार्च २०२५ : मुंबई : आपल्या शरीरात खनिजांचे आणि क्षार पदार्थांचे प्रमाण वाढल्यावर किडनी स्टोन तयार होऊ शकतो.पोटात जेव्हा ऑक्जालेट, कॅल्शिअम सारखे क्रिस्टल्स जमा होऊ लागतात,तेव्हा पोटात एक गाठ तयार होते.ही गाठ दगडासारखीच कठीण असते यालाच किडनी स्टोन असे म्हणतात.स्टोन हा किडनीमध्ये होत असतो म्हणून याला किडनी स्टोन म्हणतात.हे खडे लहान धमन्यांपासून मोठ्या धमन्यांपर्यंत वेदनादायक स्वरूपात तसेच वेगवेगळ्या आकाराचे तयार होऊ शकतात. या बद्दल नेफ्रोलॉजिस्ट, डॉ. अमित नागरिक आपल्याला अधिक माहिती सांगत आहेत.
हे आहेत कारण !
योग्य प्रमाणात पाणी न पिणे : निर्जलीकरणामुळे मुतखड्याचा धोका वाढतो.
ऑक्जालेटयुक्त : ऑक्जालेटयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्यावर,जास्त मीठ आणि उच्च प्रथिनेयुक्त आहारामुळे किडनीमध्ये खडे निर्माण होऊ शकतात.
अनुवंशिकता, हायपर गैराथायरॉईडीझम, मूत्रमार्गाचा (UTI) आणि काही औषधे इत्यादी प्रकारच्या आजारांमुळे सुद्धा किडनीत स्टोन तयार होण्याची शक्यता असते.

हि आहेत लक्षणे
ओटीपोटात किंवा मांडीवर आणि पाठीच्या खालच्या भागात, तीव्र वेदना.
लघवी करताना त्रास होणे किंवा जळजळ होणे.
लघवीवाटे रक्त (गुलाबी, लाल किंवा तपकिरी रंग) येणे.
वारंवार लघवी करण्याची इच्छा होणे.
मळमळ आणि उलट्या होणे.
संसर्ग झाल्यावर ताप आणि थंडी वाजणे.
मुतखड्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.मूत्रपिंडातील खड्यामुळे मूत्रपिंडाचे आजार होत नाही पण जर ते निघून गेले नाहीत आणि तुमचे मूत्रमार्ग अवरोधित केले, तर मूत्रपिंडांचे कायमचे नुकसान होऊ शकते.
उपचार
रोजच्या जिवनात द्रवपदार्थांचे सेवन वाढवा.वेदनाशामक औषधांनी लहान खडे नैसर्गिकरीत्या निघू शकतात. काही औषधे मूत्रमार्गाच्या स्नायूंना आराम देण्यासाठी मदत करतात,ज्यामुळे दगड निघणे सोपे होते.
शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी मोठ्या खड्यांचे लहान २ तुकड्यांमध्ये विभाजन करण्यासाठी ध्वनी लहरीचा वापर करते, ज्यामुळे ते निघणे सोपे होते.मूत्रमार्गात एक पातळ नळी घालून खडे काढून टाकून किवा तोडून मूत्रमार्गाची तपासणी करता येते.
गंभीर प्रकरणांमध्ये, मोठे किंवा अडथळा आणणारे २ खडे काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागू शकते.मूत्रपिंडातील खडे व्यवस्थापित करण्यासाठी तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा.
महत्त्वाची गोष्ट
शरीर हायड्रेट ठेवणे महत्वाचे आहे त्यामुळे रोज किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या.संतुलित आहाराची निवडा आणि सोडियमचे म्हणजेच मिठाचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ खाणे टाळा.तज्ज्ञांच्या मदतीने कॅल्शियमचे सेवन करावे.नियमित व्यायाम, योग्य आहार यामुळे मुतखडा तयार होण्याचा धोका कमी होतो.तुमच्या मूत्रपिंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.