DA News : गेल्या काही दिवसांपासून महागाई भत्ता वाढीबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. होळीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र सरकारने याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही. परंतु येत्या काही दिवसांनी महागाई भत्ता वाढीचा निर्णय होणार आहे.
सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी तीन टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 56% इतका होणार असून ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.

दुसरीकडे गेल्या काही महिन्यांची केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची आठवा वेतन आयोगाची मागणी नुकतेच पूर्ण झाली आहे. 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाला मान्यता देत सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी पूर्ण केली असून आता याच आठवा वेतन आयोग संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे.
काय आहेत डिटेल्स
जानेवारीमध्ये मोदी सरकारने आठवावेतन आयोगाला मान्यता दिली आणि आता केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लवकरच सादर केल्या जाणार आहेत. आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये होईल अशी शक्यता आहे.
एप्रिलमध्ये नवीन वेतन आयोगाच्या सदस्यांची स्थापना होणे अपेक्षित असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला असून समितीची स्थापना झाल्यानंतर हा आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार आणि भत्त्यांमधील बदलांवर काम करणार आहे.
दरम्यान, आठवा वेतन आयोगाच्या समितीच्या शिफारशी सरकारकडे पोहोचण्याच्या आधीच काही चर्चांना देखील ऊत आला आहे. यातील मुख्य चर्चा म्हणजे 8 व्या वेतन आयोगातील महागाई भत्ता (DA) शून्य होऊ शकतो.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 53 टक्के डीए मिळतोय. मात्र जानेवारी 2025 पासून हा महागाई भत्ता 56% होणार असून याचा शासन निर्णय लवकरच काढला जाणार आहे. त्यानंतर जुलै 2025 पासून महागाई भत्ता आणखी तीन ते चार टक्क्यांनी वाढेल.
दरम्यान, आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता बेसिक सॅलरी मध्ये जोडला जाणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अर्थातच आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता शून्य होईल आणि त्यानंतर मग वार्षिक आधारावर महागाई भत्ता सात ते आठ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
आठवा वेतन आयोगाबाबत बोलायचं झालं तर 1 जानेवारी 2026 पासून या वेतन आयोगाच्या शिफारशी कर्मचाऱ्यांना लागू केल्या जाणार आहेत. सध्याचा सातवा वेतन आयोग हा 2016 मध्ये लागू झाला होता आणि यानुसार 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागू नये अपेक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे.
कारण की आतापर्यंतचा वेतन आयोगाचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू झाला आहे. म्हणजेच, जानेवारी 2026 मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 0 होण्याची शक्यता आहे. त्यावेळी त्यांचा महागाई भत्ता त्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये जोडला जाईल आणि मग त्यापुढे त्यांना नव्याने महागाई भत्ता वाढ लागू केली जाईल.