Ahilyanagar Report : श्रीगोंद्याच्या राजकारणात मोठा भूकंप ! ‘भाऊ’ एकत्र? की ‘वाद’ कायम ? नवा ट्विस्ट

Published on -

Ahilyanagar Report : राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो, किंवा कुणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो… हे ऐकलंय ना..? नक्कीच ऐकलं असेल. राजकीय बातम्या, लेख, स्तंभ किंवा थेट राजकीय पुस्तकात हा डायलाँग कुठे ना कुठे दिसतोच… या वाक्याची उदाहरणं सर्वात जास्त वेळा अहिल्यानगर जिल्ह्यात दिसतात. कधी विखे- शिंदे वाद होतो. तो मिटतो. कधी भाजपचे पराभूत आमदार विखेंवर टिका करतात, कधी तेच गळ्यात गळे घालताना दिसतात. कधी काळे-कोल्हे टोकाचा वाद होतो, तर कधी तेच एकमेकांना हात देतात…

हे सगं नगरकरांनी पाहिलंय ना? आता पुन्हा याच थीमची घटना नगर जिल्ह्यात घडली. फरक फक्त एवढाच की अशा घटना कायम उत्तरेत दिसतात, यावेळी ती दक्षिणेत दिसली. २५ मार्चला बातमी आली की, श्रीगोंदे बाजार समितीच्या संचालक मंडळाने साजन पाचपुते यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली. आता बाजार समितीवर सत्ता कुणाची? तर, राहुल जगतापांची. सत्ता घ्यायच्या वेळेस पॅनल कुणाचा होता? तर राहुल जगताप- साजन पाचपुतेंचा यांचाच… मग असं अचानक वारं कसं फिरलं? नेमका काय वाद आहे? भविष्यात काय होऊ शकतं? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

मित्रांनो, श्रीगोंद्याचं राजकारण बेरकी, हे आम्ही कायम म्हणत असतो. निम्मा तालुका बागायती व निम्मा तालुका जिरायती असल्याने येथे, जिल्हा परिषद गटावाईज तगडे नेते आहेत. येथे नातंगोतंही आहे आणि जातीचं समीकरणही आहे. एक दोन नाही, तर तब्बल ३ सहकारी साखर कारखाने आहेत. प्रत्येक नेते आपापले कार्यकर्ते सांभाळून आहे. निवडणूक ग्रामपंचायतीची असो नाहीतर थेट आमदारकीची… इथलची प्रत्येक निवडणूक ही त्वेषाने होते. गेल्या विधानसभेत काय झालं, हे सर्वांनी पाहिलं. तीन साखर सम्राटांनी आपापली ताकद आजमावली, पण मतदारांनी दुसऱ्या पिढीच्या हातात सत्ता दिली.

हे सगळ्यांना माहित आहे, आणि आम्हीही तेच ते रिपीट करणार नाही… तर मुद्दा होता, श्रीगोंदा बाजार समितीचा… पहिल्यांदा श्रीगोंदा बाजार समिती आपण समजावून घेऊ. श्रीगोंदा बाजार समितीत १८ संचालक आहेत. या निवडणुकीत साजन पाचपुते व माजी आ. राहुल जगताप यांनी एकत्र पॅनल करत निवडणूक लढवली होती. जगताप गटाचे दहा संचालक निवडून आले होते. नागवडे गटाचे तीन व बबनराव पाचपुते गटाचे चार संचालक विजयी झाले होते. सध्या शिवसेना उबाठा गटाचे उपनेते साजन पाचपुते हे स्वतःही निवडून आले होते. म्हणजेच साजन पाचपुते- राहुल जगताप गटाचे ११ व विरोधी गटाचे ७ असे संख्याबळ बाजार समितीत आहे.

नव्या दमाच्या साजन पाचपुते व राहुल जगताप यांनी, एकत्र येत बाजार समितीची निवडणूक लढविल्याने तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. श्रीगोंद्यासाठी हे नवे राजकीय समिकरण होते. विशेष म्हणजे त्या निवडणुकीत हे समिकरण यशस्वीही झाले होते. नागवडे व बबनराव पाचपुते गटाला बाहेर ठेवण्यात या अनपेक्षित युतीला यश आले होते. आता श्रीगोंद्यातील पुढच्या सगळ्या निवडणुका साजन पाचपुते व राहुल जगताप हे एकत्र लढवतील, अशी चर्चा सुरु झाली.

मात्र ती काही दिवसांतच फूस्सस्स झाली… बाजार समितीच्या सभापती निवडीवरून वाद झाला. याच वादाची किनार, नंतर थेट विधानसभा निवडणुकीपर्यंत वाढत गेली. राहुल जगताप यांना महाविकास आघाडीचे तिकीट मिळू नये म्हणून, साजन पाचपुते यांनी यशस्वी चाली खेळल्या. विरोधक असणाऱ्या नागवडेंना थेट मातोश्रीवर नेऊन, साजन पाचपुते यांनी जगतापांवर असणाऱ्या रागाचा बदला घेतला. त्यांच तिकीट अलगद कापलं. या खेळीने जगतापही त्वेषात आले आणि मला नाही तर कुणालाच नाही… असं काहीसं करत त्यांनी थेट अपक्ष निवडणूक लढवली. जगतापांनीही अशी ताकद दाखवून दिली की, पराभूत झाले असले तरी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली.

श्रीगोंद्याचं राजकारण तेव्हाही बदललं. कारण बाजार समितीत जगताप- साजन पाचपुते ही युती दिसली. विधानसभा निवडणुकीत दोघे विरोधात गेले. विधानसभेला साजन पाचपुते व नागवडे युती झाली. मात्र ती ही सध्या शितयुद्धात दिसत आहे. त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नागवडे, पाचपुते हे सगळे विखेंसोबत दिसत होते. मात्र नंतरच्या विधानसभेला तेही सगळे स्वतंत्र झाले. म्हणूनच आम्ही म्हणतो, श्रीगोंद्याचं राजकारण हे बेरकीच आहे. जे स्वप्नातही होईल असं वाटत नाही, ते श्रीगोंद्यात होतं. आणि जे होईल अशी अपेक्षा असते, ते येथे कधीच होत नाही…

आता बाजार समितीत सुरु झालेला हा वाद पुढेही असाच राहील का? की त्यात समझोता होईल? हे कुणीच सांगू शकत नाही. या वादात नागवडे गट साजन पाचपुतेंना साथ देईल का? हेही सांगता येत नाही. आ. पातपुते गट कुणाच्या बाजूने आहे किंवा राहील? हेही सांगता येत नाही… हा, पण एक मात्र नक्की की, नागवडे- जगता- पाचपुते या वादात मात्र आ. विक्रम पाचपुते यांचं राजकारण मात्र सेट होऊ लागलं आहे. आ. पाचपुते विरोधक एकमेकांशी स्पर्धा करण्यात गुंतले असताना विक्रम पाचपुते हे शांत व संयमी राजकारण करत विकासकामे मार्गी लावताना दिसत आहेत. तसंही विखेंनी साकळाईचा प्रश्न मार्गी लावल्याने, पाचपुतेंचं श्रीगोंद्यातील राजकारण सेट झाल्यात जमा आहे. आता विरोधकांच्या तंगडेओढीचा फायदाही विक्रम पाचपुतेंना होणार आहे.

श्रीगोंद्याची बदलती राजकीय गणिते पाहिली तर, भविष्यात दोन्ही पाचपुते एकत्र दिसतील, असेही काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. कारण आ. विक्रम पाचपुते किंवा साजन पाचपुते ही पाचपुते कुटुंबाची दुसरी पिढी आहे. रक्ताचे नाते आहे. त्यामुळे जे मुंडे कुटुंबात दिसले, तेच भविष्यात पाचपुते कुटुंबातही दिसू शकते, असा अंदाज बांधला जातोय. त्यातही माजी आ. बबनराव पाचपुते यांचे द्वितीय चिरंजीव प्रताप भैय्या पाचपुते हेही आता राजकारणात लक्ष घालताना दिसत आहेत.

पाचपुते कुटुंबाच्या पहिल्या फळीला एक आदर्श राजकारणी म्हणून ओळखले जात होते. बबनराव पाचपुते मंत्री असताना त्यांचे बंधू सदाआण्णा पाचपुते हे तालुक्यात लक्ष द्यायचे. सर्वांच्या सुख-दुखात सहभागी व्हायचे. सेम तशीच टेक्निक आता विक्रम पाचपुते व प्रताप भैय्या पाचपुते हेही वापरत असल्याचे दिसत आहे. विधीमंडळाच्या कामामुळे तालुक्यातील लक्ष कमी होऊ नये म्हणून आता पाचपुते कुटुंबाने तालुक्यातील सर्व जबाबदारी प्रताप भैय्या पाचपुते यांच्यावर सोपवलेली दिसत आहे. पाचपुते कुटुंबातील ही जोडगोळी विरोधकांना किमान २५-३० वर्षे जड जाईल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

हे पण वाचा : सुजय विखे खरंच खासदार होतील का ? सुजय विखेंचं ‘पुनर्वसन मिशन’ सुरू ? राज्यसभेकडे डोळा, कर्डिलेंचा शब्द ठरणार ‘गेमचेंजर’!

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe