Inspirational Story : चर्चा तर होणारच ! शेतकऱ्याचा मुलगा बनला गावातील पहिला सरकारी अधिकारी, ठरला गावातील पहिलाच सरकारी नोकरदार

एका शेतकऱ्याच्या मुलाने स्पर्धा परीक्षेत झेंडा रोवला आहे. या तरुणाची थेट ED मध्ये अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून हा तरुण त्याच्या गावातील पहिलाच सरकारी नोकरदार आहे. म्हणजेच आतापर्यंत या तरुणाच्या गावातील कोणताच व्यक्ती सरकारी नोकरदार बनलेला नाही. यामुळे सध्या या तरुणाची संपूर्ण देशभर चर्चा सुरू आहे.

Published on -

Inspirational Story : इच्छा असेल तर मार्ग दिसतो, अस आपण नेहमीच ऐकतो अन वाचतो. पण खरंच इच्छा असेल तर डोळ्यांना मार्ग दिसत नसेल तरी देखील मार्ग शोधता येतो आणि हीच गोष्ट खरी करून दाखवली उत्तर प्रदेश राज्यातील फर्रुखाबाद येथील एका शेतकऱ्याच्या लेकाने. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो युवकांमध्ये फर्रुखाबाद जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याच्या पोरांन मैदान मारलंय.

महत्त्वाचे म्हणजे तो त्याच्या गावातील सरकारी नोकरी मिळवणारा पहिलाच तरुण बनलाय. म्हणजेच आत्तापर्यंत त्याच्या गावात कोणीच सरकारी नोकरीला नव्हते. याचमुळे त्याचे हे यश अधिक खास ठरते आणि हेच कारण आहे की या शेतकऱ्याच्या पोराची सध्या संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

सरकारी नोकरी मिळवणारा पहिला तरुण

घरची परिस्थिती अगदीच हलाखीची असताना सुद्धा या शेतकऱ्याच्या मुलाने जे कष्ट घेतलेत आणि जे यश मिळवलं ते खरंच वाखाण्याजोगे आहे. फर्रुखाबाद जिल्ह्यातील खेरे नगला गावातील आयुष राजपूत याने ही किमया साधली असून तो त्याच्या गावातील सरकारी नोकरी मिळवणारा पहिलाच तरुण ठरला आहे.

खरे तर आयुष्य बालपण अगदीच हालाखीच्या परिस्थितीत गेले. आर्थिक टंचाईत बालपण गेल्याने आणि वडिलांनी शेतीमध्ये किती कष्ट केलेत याची जाणीव असल्याने त्याने आपण आपल्या आयुष्यात काहीतरी मोठे करायचं हे स्वप्न अगदी बालपणीच आपल्या मनावर बिंबवलं होतं.

दिवसभर वडिलांसोबत शेतात

यामुळे तो दिवसभर आपल्या वडिलांसोबत शेतात राबायचा आणि त्याच्याकडे शिल्लक राहिलेल्या वेळेत तो अभ्यास करायचा. हा त्याचा रोजचा दिनक्रम. सूर्य आणि चंद्र ज्याप्रमाणे त्यांचा दिनक्रम सोडत नाहीत त्याचप्रमाणे आयुष्य देखील आपला दिनक्रम सोडत नसे.

सहाय्यक प्रवर्तन अधिकारी

त्याची हीच चिकाटी अखेर कार त्याला कामी आली. आयुष्याच्या एकदम कठीण परिस्थितीत देखील त्याने आपली चिकाटी सोडली नाही. अन याच जिद्दीच्या जोरावर आयुष आज एक अधिकारी बनलाय. त्याने ssc, cgl परीक्षेसाठी स्वत:ला झोकून दिले होते अन म्हणूनच आज त्याची ईडीमध्ये सहाय्यक प्रवर्तन अधिकारी या मोठ्या पदावर निवड झाली.

ED मध्ये नियुक्ती

कष्ट जेवढे मोठे तेवढे यश सुद्धा मोठे हेच आयुषच्या या उदाहरणावरून स्पष्ट होते. मित्रांनो, घरची परिस्थिती ही जेमतेम पण मनात शिकण्याची जिद्द होती. मिळालेल्या माहितीनुसार, ED मध्ये नियुक्ती झालेल्या आयुषचं शिक्षण हे एसडी इंटर कॉलेज पाहला येथून सुरू झालं.

इथे त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुढे त्याने स्वराजवीर इंटर कॉलेजमधून 12वी उत्तीर्ण केली. बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बीएससी ची पदवी घेतली. रामकृष्ण महाविद्यालयातून त्याने ही पदवी घेतली. 2022 मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर आता 2025 मध्ये तो ईडीचा अधिकारी बनलाय.

तीन वर्षांपेक्षा कमी काळात

म्हणजे तीन वर्षांपेक्षा कमी काळात त्यांनी हे यश मिळवला आहे. महत्त्वाची बाब अशी की या तरुण आणि शिक्षणासाठी दररोज 15 किलोमीटरचा सायकलचा प्रवास पूर्ण केला आहे. मात्र आज खेरे नगला गावातील आयुष राजपूत याने ईडी परीक्षेत यश मिळवलय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhas Saini (@abhassaini)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe