महाराष्ट्रातील ‘या’ महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या काही वाहनचालकांना मिळणार टोल माफी ! वाचा सविस्तर

नुकत्याच काही दिवसांपूर्वी सरकारने मुंबई मधील सर्व टोलनाक्यांवरून प्रवास करणाऱ्या छोट्या वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा अनेकांना फायदा होतोय आणि शासनाच्या निर्णयाचे कौतुक सुद्धा होत आहे. दरम्यान आता राज्यातील आणखी काही महत्त्वाच्या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टोल माफी देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.

Published on -

Maharashtra Expressway : येत्या दोन तारखेला महाराष्ट्राला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण दोन मे 2025 रोजी होणार आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा 700 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून आत्तापर्यंत या महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा भाग अर्थातच नागपूर ते इगतपुरी हा भाग वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या महामार्गाचा शेवटचा टप्पा अर्थात 76 किलोमीटर लांबीचा इगतपुरी ते आमने हा टप्पा दोन मे 2025 तुला होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशी सारी परिस्थिती असतानाच मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग बाबत नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या काही वाहनचालकांना टोलमाफी देण्याचा मोठा निर्णय सरकारकडून घेतला गेला असून या निर्णयाची अंमलबजावणी पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे.

समृद्धी महामार्ग सोबतच मुंबई पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना सुद्धा टोल माफी मिळणार आहे. दरम्यान आता आपण शासनाने मुंबई – पुणे महामार्ग आणि समृद्धी महामार्गाच्या टोल माफी बाबत नेमका काय निर्णय घेतलाय? याच बाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय आहे शासनाचा निर्णय ?

खरे तर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई मधील सर्व टोलनाक्यांवरून छोट्या वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय झाला. यानंतर आता मुंबई पुणे महामार्ग आणि नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या काही वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या दोन्ही महामार्गांवरून धावणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी दिली जाणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला आणि वापराला चालना मिळावी यासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले आहेत.

मात्र अजूनही महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर म्हणावा तसा वाढलेला नाही आणि हीच बाब विचारात घेता आता राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी टोलमाफीचा मोठा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.

महत्वाचे म्हणजे मुंबई पुणे महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय लवकरच लागू होणार आहे. महाराष्ट्र दिनापासून अर्थातच एक मे पासून हा निर्णय लागू होणार आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी 1 मे 2025 पासून अर्थातच महाराष्ट्र दिनापासून होण्याची शक्यता असून खरंच या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर सरकारकडून राज्यातील वाहनचालकांना ही महाराष्ट्र दिनाची मोठी भेट ठरणार आहे. पण, या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 100 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असल्याची माहिती जाणकारांकडून समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe