पुण्याला 5,262 कोटी रुपयांचा नवा मार्ग मिळणार ! आता ‘या’ भागात विकसित होणार नवा उन्नत मार्ग, कसा असणार रूट ? पहा….

पुण्यातील नागरिकांना आगामी काळात आणखी एका नव्या उन्नत मार्गाची भेट मिळणार आहे. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने पुण्यातील एका महत्त्वाच्या रस्ते विकासाच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

Published on -

Pune News : काल 29 एप्रिल 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाचे एक महत्त्वाचे बैठक संपन्न झाली असून या बैठकीत पुणेकरांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग संदर्भात मोठा निर्णय झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते यवत दरम्यान नवीन उन्नत मार्ग विकसित केला जाणार आहे. हडपसर ते यवत दरम्यान सहा पदरी उन्नत मार्ग म्हणजेच उड्डाणपूल विकसित केला जाणार असून यामुळे या भागातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होईल असा विश्वास सुद्धा व्यक्त करण्यात आला आहे.

खरंतर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हडपसर ते यवत यादरम्यान नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळते. या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि यामुळे या भागातील रस्त्याचे रुंदीकरण झाले पाहिजे अशी मागणी केली जात होती.

पण रस्ता रुंदीकरणासाठी या भागात मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या आणि हेच कारण आहे की आता शासनाच्या माध्यमातून हडपसर ते यवत यादरम्यान सहा पदरी उन्नत मार्ग विकसित केला जाणार असून रस्ता रुंदीकरण सुद्धा होणार आहे.

राज्य शासनाने जवळपास 5262 कोटी रुपयांचा हा प्रकल्प काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला असल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या प्रकल्पासाठी आमदार राहुल कुल यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

आमदार राहुल कुल यांनी राज्य शासनाकडे तसेच केंद्राकडे या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला, एवढेच नाही तर त्यांनी स्वतः नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा प्रकल्प मार्गी लावावा अशी मागणी केली होती आणि आता आमदार राहुल कुल यांचा हा पाठपुरावा यशस्वी झाला असून राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता मंजुरी दिलेली आहे.

त्यामुळे आता या प्रकल्पाची प्रत्यक्षात अंमलबजावणी शक्य होणार असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हडपसर ते यवत या भागात जी वाहतूक कोंडी होत होती ती कायमची दूर होणार असल्याचे म्हटले जात आहे.

या प्रकल्पामुळे पूर्व पुणे, हवेली आणि दौंड तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार अजून या भागातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे या भागातील वाहतूक फारच सुरळीत होणार आहे आणि परिसरातील लोकांचे जीवनमान सुद्धा सुधारणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News