8th Pay Commission : जर तुम्ही ही शासकीय सेवेत असाल किंवा तुमच्या कुटुंबातूनच व मित्र परिवारातून कोणी शासकीय सेवेत असेल तर तुमच्यासाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. ही बातमी देशातील सुमारे ५० लाख सरकारी कर्मचारी व ६० लाख पेन्शनधारकांसाठी जे की नव्या आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी अधिक खास ठरणार आहे.
खरे तर, 16 जानेवारी 2025 रोजी मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. मात्र असे असेल तरी अजूनही आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झाली नाही. परंतु लवकरच आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणार असून याच संदर्भात आता महत्त्वाची माहिती हाती आहे. दरम्यान, आता आपण आठवा वेतन आयोगाच्या घोषणेनंतर आत्तापर्यंत काय-काय झाल आहे याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

सरकारने घेतलेत 2 महत्वाचे निर्णय !
आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात गेल्या महिन्यात सरकारने काही मोठे निर्णय घेतले आहेत. यातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने नव्या वेतन आयोगाच्या कामकाजासाठी अतिरिक्त 42 पदांच्या नियुक्तीसाठी संबंधितांना आदेश जारी केले आहेत.
या संदर्भातील परिपत्रक 21 एप्रिल 2025 रोजी जारी करण्यात आले आहे. या संबंधित पदांची नियुक्ती ही प्रतिनियुक्ती म्हणून केले जाणार आहे आणि पदांची नियुक्ती आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेपासून तर अंमलबजावणी पर्यंत राहणार आहे.
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या क्साल्लेद, z अनुषंगाने हे एक मोठे पाऊल समजले जात आहे आणि यामुळे लवकरात लवकर नव्या वेतन आयोगाची स्थापना होईल आणि कामकाज सुरू होईल अशी आशा आहे. या 42 पदांव्यतिरिक्त एक अध्यक्ष व दोन प्रमुख सदस्यांचीही लवकरच नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे नविन वेतन आयोगाचे काम येत्या काही दिवसांनी सुरू होईल आणि कामकाज अधिक वेगाने पूर्ण होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. नव्या वेतन आयोगाच्या समितीत दोन उपसचिव, तीन अवर सचिव आणि 37 इतर कर्मचारी कार्यरत असतील अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे.
आठव्या वेतन आयोगाची स्थापना कधी होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, नविन आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नावे ही अंतिम करण्यात आली आहेत. तथापि याची अधिकृत घोषणा झालेली नाही, पण कोणत्याही क्षणी याची अधिकृत नोटिफिकेशन जारी होईल असे बोलले जात आहे.
अर्थातच अध्यक्षांची आणि सदस्यांची नावे जाहीर झाल्यानंतर आठव्या वेतन आयोगाची स्थापना होणार आहे, w प्रत्यक्षात कामकाज सुरू होणार आहे. दरम्यान, जेसीएम (राष्ट्रीय परिषद) मार्फतही नव्या वेतन आयोगाच्या बाबत तयारी सुरू करण्यात आली आहे.
राष्ट्रीय परिषदेकडून गेल्या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या बैठकीत केंद्र सरकारकडे सादर होणाऱ्या निवेदनाची तयारी करण्यात आली असल्याची खात्रीलायक बातमी हाती आली होती. आम्ही आपणास सांगू इच्छितो की जेसीएममच्या या निवेदनात किमान वेतन, पदोन्नती, पेन्शन, फिटमेंट फॅक्टर आणि वेतनश्रेणी या मुद्द्यांचा समावेश राहणार असून, सर्व कर्मचारी संघटनांकडून 20 मेपर्यंत सूचना देखील मागविण्यात आल्या आहेत.
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?
सध्याचा सातवा वेतन आयोग एक जानेवारी 2016 पासून लागू आहे. वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा अलिखित नियम पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत आला आहे. यानुसार आठवा वेतन आयोग देखील एक जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. कारण की सातव्या वेतन आयोगाला 31 डिसेंबर 2025 रोजी दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे.
म्हणजेच या दिवशी सातवा वेतन आयोग समाप्त होईल. त्यानंतर मग एक जानेवारी 2026 पासून नवा वेतन आयोग बहाल केला जाणार आहे. प्रत्यक्षात मात्र 2017 मध्येच नव्या आठव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळेल असे बोलले जात आहे आणि केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या आठव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे.