अहिल्यानगरमधील जय भवानी सांस्कृतिक कला केंद्रातील महिलांनी युवकांनी मारहाण करून अश्लील कृत्य केले असल्याचा आरोप केला असून या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली.
महिलांनी म्हटले की, पांढरीपूल खोसपुरी येथे जय भवानी सांस्कृतिक कला केंद्र आहे. त्या ठिकाणी ४ मे २०२५ रोजी रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास काही युवक मद्यधुंद अवस्थेत आले होते व त्यांनी आतमध्ये प्रवेश करून आम्हाला पार्टी लावायची आहे. आत्ताच्या आत्ता आमची पार्टी लावा तेव्हा महिलांनी त्यांना सांगितले की आमचे कला केंद्र बंद झाले आहे असे सांगितले असता त्या युवकांना राग आला व त्यांनी महिलांना अपशब्द वापरत शिवीगाळ लाथाबुक्याने मारहाण केली.

त्यानंतर ४ ते ५ मोटरसायकल वरून ८ ते १० युवक हे हातात तलवार, काठ्या, गज घेऊन आले सदरील घटनाही सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून त्या युवकांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेऊन गेले आहे.कला केंद्रातील महिलांना हे तरुण धमकी देत असून या तरुणांना लवकरात लवकर अटक करून योग्य ते कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत संबंधित आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाण केल्याप्रकरणी रागिणी काळे यांच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.