8th Pay Commission: हजारांतला पगार थेट लाखोंत जाणार; काय असते पे लेव्हल स्ट्रक्चर? वाचा

Published on -

सध्या केंद्र सरकारचे करोडो कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठवे वेतन आयोग कधी लागू होणार आणि पगार किती वाढणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरपासून भत्यांपर्यंत सर्वकाही बदलणार असून त्यातून मोठा फायदा होणार आहे.

कसा ठरणार वेतन आयोग?

वेतन आयोगात वाढणारा पगार हा अनेक घटकांवर ठरतो. आठव्या वेतन आयोगात पे लेव्हल स्ट्रक्चर ‘फिटमेंट फॅक्टर’ आणि पे मॅट्रिक्सच्या आधारावर ठरते. फिटमेंट फॅक्टर हे एक गुणक आहे. जे सध्याच्या मूळ वेतनाला लागू केले जाते. फिटमेंट फॅक्टर साधारणपणे 2.57 ते 2.86 पर्यंत असू शकतो. त्यामुळे मूळ वेतनात वाढ होऊन, नवीन पे लेव्हल स्ट्रक्चर तयार होते.

फिटमेंट फॅक्टर कसे ठरते?

फिटमेंट फॅक्टरवर कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन निश्चित केले जाते. सातव्या वेतन आयोगात पगारात 14.27 टक्के वाढ झाली होती. आता आठव्या वेतन आयोगात हीच वाढ थेट 18 ते 24 टक्के होईल, असे गणित मांडले जात आहे. त्यातही फिटमेंट फँक्टरवर सगळ्या वाढीचे गणित अवलंबून असेल. म्हणजेच फिटमेंट फँक्टरवरच वाढीची रक्कम ठरणार आहे.

स्ट्रक्चर कसे ठरवले जाते?

1. फिटमेंट फॅक्टर:
हा घटक सध्याच्या मूळ वेतनाला गुणून, नवीन वेतन निश्चित करतो.
2. पे मॅट्रिक्स:
वेतन आयोग पे मॅट्रिक्स तयार करतो. ज्यामध्ये प्रत्येक लेव्हलसाठी विशिष्ट वेतन श्रेणी दर्शविली जाते. प्रत्येक लेव्हलला एक विशिष्ट पे बँड आणि पे स्केल दिला जातो. यानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन ठरते.
3. सध्याचे वेतन:
आठव्या वेतन आयोगात, कर्मचाऱ्यांचे सध्याचे वेतन आणि पद यावर नवीन पे लेव्हल ठरते.

पे लेव्हल स्ट्रक्चरचे फायदे काय?

पे लेव्हल स्ट्रक्टरमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होते. वेतन संरचना अधिक पारदर्शक आणि समतोल होते. शिवाय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना चांगले वेतन आणि पेन्शन मिळते. त्यामुळे पे लेव्हल स्टक्चर हा खूप महत्त्वाचा घटक असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe