भारत-पाकिस्तानमध्ये सध्या चांगलाच तणाव वाढला आहे. युद्धही सुरु झाल्याची स्थिती आहे. अशा वेळी, नागरिकांच्या सुरक्षिततेची रोज नव-नवी माहिती दिली जाते. आता तुमच्या घरावरूनही रोज अनेक विमाने उडताना दिसतात. मग आपल्या घरावरुन उडणारे विमान कोणाचे? हा प्रश्न अनेकांना पडतो. आज आम्ही तुम्हाला तुमच्या घरावरुन उडणारे विमान कुणाचे व कोणत्या कंपनीचे आहे, हे कसे शोधायचे ते सांगणार आहोत.
सामान्यांना पडलीय भिती
भारत-पाकिस्तान हल्ल्याबाबत रोज सोशल मीडियावर अनेक मॅसेज व्हायरल होताना दिसत आहेत. हे मॅसेज पाहून सामान्यांना धडकी भरत आहे. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांतील युद्धांत फायटर जेट, ड्रोन, विमान हल्ले सुरु आहेत. अशा वेळी आपल्या घरावरुन किंवा आपल्या गावाच्या आकाशावरुन अनेक विमाने उडताना दिसली की धडकी भरत आहे.

स्वतः मिळवा विमानाची माहिती
खरं तर flightradar24.com नावाचं एक पोर्टल आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या होम लोकेशनवरून उडणाऱ्या विमानाची माहिती तपासू शकता, मात्र त्यात लष्कराच्या विमानाची माहिती दिली आहे की नाही, याची आम्ही पुष्टी करत नाही. flightradar24.com ची तपासणी केली असता जवळपास जगभर उडणारे विमान या पोर्टलवर पिवळ्या रंगात दाखवण्यात आले. येथे तुम्ही बहुतेक व्यावसायिक एअरलाइन्स पाहू शकता. यावरुन तुम्हाला देखील लक्षात येईल.
इतर तपशीलही तपासता येतो
flightradar24.com वर आपल्या घराजवळ किंवा जवळ उडणाऱ्या विमानाच्या आयकॉनवर क्लिक करा. यानंतर मोबाइल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर तुम्ही त्या विमानाचे डिटेल्स तपासू शकता. या तपशीलात विमानाचे नाव आणि विमान कुठे जात आहे, याची माहिती उपलब्ध आहे. इंटरनेट जगात अशी अनेक पोर्टल्स आहेत जी फ्लाइट ट्रॅकिंग ऑफर करतात. अशावेळी तुम्ही इतर पोर्टल्सचाही आधार घेऊ शकता.
फेक न्यूजपासून दूर राहा
सिंदूर ऑपरेशननंतर बरीच माहिती समोर आली आहे, जी प्रत्यक्षात खोटी आहे. अनेक सोशल मिडिया साईटवरुन फेक माहिती दिली जात आहे. त्यानंतर या माहितीची शाहनिशा करुन ती चुकीची आहे, असे संदेशही देण्यात आले आहेत. या प्रकरणात, आपण केवळ अस्सल स्त्रोत तपासला पाहिजे. त्यामुळे कोणत्याही व्हायरल गोष्टींवर विश्वास ठेऊ नका.