आपण जे काही पैसे कमवतो त्यातील काही रक्कम आपण आपल्या भविष्यासाठी देखील वाचवतो. बचत करणे योग्य मानले जाते कारण ते भविष्यात तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मदत करते. काही लोक त्यांचे पैसे बँकेत ठेवतात, तर काही लोक ते एफडीमध्ये जमा करतात. भारत सरकारची अटल पेन्शन योजना नावाची एक योजना आहे, ज्यामध्ये सामील होऊन तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षानंतर दरमहा 5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.
काय आहे योजना?
अटल पेन्शन योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाते. या योजनेत 18-40 वयोगटातील लोक अर्ज करू शकतात. यामध्ये, तुम्हाला प्रथम दरमहा प्रीमियम जमा करावा लागेल, जो वयानुसार असेल. यानंतर, वयाच्या 60 व्या वर्षानंतर तुम्हाला दरमहा 1 हजार रुपयांपासून ते 5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.

अर्ज कसा करावा?
अर्जासाठी तुम्हाला प्रथम बँकेत जावे लागेल. संबंधित अधिकाऱ्याला भेटावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड द्यावे लागेल. यासोबतच, तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती बँक अधिकाऱ्याला द्यावी लागेल. आता बँक अधिकारी तुमच्या अर्जावर प्रक्रिया करेल. त्यानंतर तुमचा अर्ज भरुन घेतला जाईल.
कसा मिळतो लाभ?
यामध्ये मासिक पेन्शन योजना 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि 5000 हजार रुपये अशी आहे. तुम्ही यापैकी कोणताही एक प्लॅन निवडू शकता. त्यानुसार तुम्हाला 60 वर्षांनंतर पेन्शन मिळते. शेवटी बँक अधिकारी तुमचे खाते योजनेशी लिंक करतो आणि दरमहा तुमच्या बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम कापली जाते.