खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरकार देतंय 5000 रुपये पेन्शन, आत्ताच ‘असा’ करा अर्ज

Published on -

सध्या प्रत्येकजण आपल्या भविष्याचा विचार करतो. आपण सध्या जे कमवतो, त्यातील काही भाग भविष्यासाठी वाचवून ठेवण्याकडे आता अनेकांचा कल वाढला आहे. अशा वेळी आपल्या पैशाचा योग्य उपयोग करुन भविष्यासाठी एक चांगली गुंतवणूक करण्यावर भर दिला जातो. अनेकजण आत्तापासून आपल्या रिटायर्टमेंटच्या आयुष्याचा व आपल्या पेन्शनचा विचार करतात. या सर्वांसाठी सरकारने एक चांगली योजना आणली आहे. या योजनेचं नाव आहे, अटल पेन्शन योजना. या योजनेतून तुम्हाला दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शन मिळणार आहे.

कोणती आहे योजना?

प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी सरकारने अटल पेन्शन योजना (APY) सुरु केली आहे. ही योजना 18 ते 40 वर्षे वयोगटातील अशा भारतीय नागरिकांसाठी आहे ज्यांचे बँकेत खाते आहे. या योजनेचा उद्देश असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या वृद्धापकाळात उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणे हा आहे.

काय आहेत अटी?

18 ते 40 वयोगटातील कोणतीही व्यक्ती अटल पेन्शन योजनेत खाते उघडू शकते. या योजनेत सामील होण्यासाठी, बचत बँक खाते, आधार आणि सक्रिय मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर आणि आधार कार्डची छायाप्रत देखील सादर करावी लागेल. अर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश मिळेल.

किती करावी लागते गुंतवणूक?

अटल पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शन मिळवता येते. त्यासाठी अर्जदाराला दरमहा 42 ते 210 रुपये गुंतवावे लागतात. ही रक्कम गुंतवण्यासाठी, तुम्हाला वयाच्या 18 व्या वर्षी ही योजना घ्यावी लागेल. जर अर्जदाराचे वय 40 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल, तर त्याला दरमहा 291 ते 1454 रुपये मासिक योगदान द्यावे लागेल. जास्तीत जास्त योगदान 5 हजार रुपये आहे.

किती दिवस पैसे भरायचे?

या योजनेत किमान 20 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणूक दर महिन्याला, दर 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांच्या कालावधीत करता येते. पैसे आपोआप डेबिट होतील. निवृत्तीनंतर तुम्हाला किती पेन्शन हवी आहे यावर किती रक्कम कापली जाईल हे अवलंबून असेल.

अर्ज कसा करायचा?

एसबीआय बँकेमार्फत अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करता येतो. तुमचे एसबीआयमध्ये बँक खाते असेल तर तुम्ही नेट बँकिंगद्वारे या योजनेचे फायदे घेऊ शकता. यासाठी प्रथम एसबीआयच्या पोर्टलवर जा. ई-सेवा लिंकवर क्लिक करा. उघडणाऱ्या नवीन विंडोमध्ये सामाजिक सुरक्षा योजना नावाची लिंक असेल. त्यावर क्लिक करा. ३ पर्याय दिसतील. तुम्हाला PMJJBY/PMSBY/APY वरून APY वर क्लिक करावे लागेल. फॉर्म उघडेल, तो योग्यरित्या भरा. सबमिट बटण दाबल्याने फॉर्म सबमिट होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe