पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी ! पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या बाबत समोर आली मोठी अपडेट

पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी पुणे रिंग रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले असून याच प्रकल्पाच्या बाबत आता एक नवीन माहिती समोर आली आहे.

Published on -

Pune Ring Road News पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पुणे रिंग रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. दरम्यान आता याच महत्त्वकांक्षी रिंग रोड प्रोजेक्ट संदर्भात एक नवीन अपडेट समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रिंग रोडचे काम सुरु करण्यात आले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे प्रस्तावित १७२ किलोमीटर लांब व ११० मीटर रुंद पुणे रिंग रोडचे काम सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, आता आपण याच बाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

या भागात पुणे रिंग रोडचे काम सुरु झाले

या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया नुकत्याच काही दिवसांपूर्वी पूर्ण झाली, यात नऊ कंपन्यांची निवड करण्यात आली. यात निवड झालेल्या कंपन्याना अडीच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार, या निवड झालेल्या कंपन्यांना आताच कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. संबंधित कंपन्यांना वर्क ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर वाडेबोल्हाई, खडकवासला, सिंहगड, मुळशी, उर्से, चाकण, हिंजवडी आणि सोरतापवाडी येथे या कंपन्यांनी एकत्रितपणे काम सुद्धा सुरू केले आहे. खरेतर, 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा पुणे रिंग रोड प्रकल्प पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागला गेला आहे.

आतापर्यंत पुणे रिंग रोड प्रकल्पाचे बहुतांशी भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे भूसंपादन बऱ्यापैकी पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंपन्यांकडून या प्रकल्पाचे काम आता सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रिंग रोडचे जवळपास 99% भूसंपादन पूर्ण झाले आहे तर पूर्व रिंग रोडचे 98% भूसंपादन पूर्ण झाले आहे. भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात आली आणि आता या प्रक्रियेत निवड झालेल्या कंपन्यांकडून याचे कामही सुरू करण्यात आले आहे.

या प्रकल्पासाठी जवळपास 42 हजार 711 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. आता आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या काही भागात सपाटीकरण, नदी-नाल्यांवरील पूल आणि भरावाचे काम सुरू करण्यात आले आहे, महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्पाचे इतर कामे पावसाळ्यातही चालू राहणार आहेत. दरम्यान या प्रकल्पाचे काम फक्त अडीच वर्षात पूर्ण केले जाणार आहे. तसेच ते जर वेळेत पूर्ण झाले नाही तर संबंधित कंपन्यांना दंड सुद्धा आकारण्यात येणार अशी माहिती प्रकल्पाशी निगडित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe