Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती, मात्र काल दरवाढीला ब्रेक लागला. मिळालेल्या माहितीनुसार काल 21 मे 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 490 रुपयांनी कमी झाली.
खरे तर, 15 मे 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 93 हजार 930 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 100 रुपये एवढी होती. मात्र नंतर यात हळूहळू वाढ होत राहिली.

16 मे रोजी 24 कॅरेट शुद्ध सोने बाराशे रुपयांनी आणि 22 कॅरेट सोने 1100 रुपयांनी वाढले. यानंतर दोन दिवस सोन्याची किंमत स्थिर राहिली आणि 19 मे रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 380 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 350 रुपयांनी वाढली.
मात्र काल 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 490 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 450 रुपयांनी घसरली आहे. आज सुद्धा सोन्याच्या किमतीतील हाच घसरणीचा ट्रेंड दिसला. म्हणून आता आपण राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे रेट कसे आहेत याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
20 मे 2025 चे सोन्याचे रेट कसे आहेत ?
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 20 मे 2025 रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 270 रुपये प्रति दहा ग्राम एवढी होती. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार वीस रुपये प्रति दहा ग्राम एवढी होती.
याशिवाय राज्यातील नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या शहरांमध्ये 20 मे 2025 रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 300 रुपये प्रति दहा ग्राम एवढी होती.
तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 50 रुपये प्रति दहा ग्राम एवढी होती.
आजचे सोन्याचे रेट कसे आहेत
आज 21 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव येथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 260 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 90 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 10 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.
शिवाय आज नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी येथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 290 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 40 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.