अहिल्यानगरला मिळणार आणखी एक नवा सहापदरी महामार्ग ! गडकरी यांची मोठी घोषणा, कसा असणार रूट ?

अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अहिल्यानगरला लवकरच एक नवा सहापदरी महामार्ग मिळणार आहे. 

Published on -

Ahilyanagar Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. नितीन गडकरी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री या पदाची धुरा सांभाळल्यानंतर देशभरातील रस्त्यांचे नेटवर्क वाढले आहे.

महाराष्ट्रात सुद्धा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या सूचनेनुसार आत्तापर्यंत अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे. राज्यात अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे सुरू आहेत. दरम्यान आता अहिल्यानगर जिल्ह्याला लवकरच एक नवीन मार्गाची भेट मिळणार आहे.

हा नवीन मार्ग नासिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अधिक खास राहणार असून हा मार्ग सहा पदरी आणि फुल काँक्रिटचा असेल. या नवीन सहा पदरी मार्गाच्या संदर्भात मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे आश्वासन दिल आहे.

कसा असेल सहापदरी मार्ग ? 

मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव ते कोपरगाव दरम्यानच्या रस्त्याचे सहा पदरी काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे याचा डीपीआर सुद्धा लवकरच रेडी होणार आहे.

कारण की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येवला शहर उड्डाणपूल किंवा बायपाससह मालेगाव, मनमाड, येवला, कोपरगाव रस्त्याचे सहापदरी काँक्रीटीकरण करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याच्या सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मंत्री नितीन गडकरी यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. 

माजी खा. समीर भुजबळ यांनी घेतली गडकरी यांची भेट

खरे तर, माजी खासदार समीर भुजबळ यांनी महाराष्ट्र राज्य शासनाचे नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार येवला तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामासंदर्भात मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

यावेळी येवला शहर उड्डाणपूल किंवा बायपाससह मालेगाव मनमाड येवला कोपरगाव रस्त्याचे अपग्रेडेशन करून सहापदरी कॉंक्रीटीकरण रस्ता तातडीने मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

याला मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि संबंधितांना या रस्त्याच्या डीपीआर तयार करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत.

आगामी काळात नाशिकमध्ये कुंभमेळा आयोजित होईल आणि या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याचे सहापदरीकरण करणे आवश्यक आहे आणि हिच बाब माजी खासदार समीर भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. 

या 3 ठिकाणी विकसित होणार नवीन रोड ओव्हर ब्रिज

एवढेच नाही तर येवला शहरा जवळील नांदगाव रोड,नागडे रोड आणि नांदेसर रोडच्या रेल्वे गेटच्या जागी रोड ओव्हर ब्रिज (ROB) मंजूर करण्यात यावा अशी सुद्धा मागणी करण्यात आली आणि या मागणीवर देखील गडकरी यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

या तीन ओव्हर ब्रिजच्या कामांसाठी सेतुबंधन योजनेतून राज्यशासनाकडून तातडीने प्रस्ताव मागवून ही कामे मंजूर करण्यात येतील अशी माहिती मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe