Maharashtra New Highway : गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या काळात महाराष्ट्रासहीत देशभरातील विविध राज्यांमध्ये रस्ते विकासाच्या मोठ्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांचे कामे सुरूच आहेत.
दरम्यान महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या रस्त्याचे काम पुढील वर्षात पूर्ण होणार आहे. पुढील वर्षात म्हणजे 2026 मध्ये महाराष्ट्राला एक नवीन हायवे मिळणार असून यामुळे प्रवाशांचे तब्बल 12 तास वाचणार आहेत.

कसा असणार नवा हायवे ?
आम्ही ज्या महामार्ग प्रकल्पाबाबत बोलत आहोत तो महामार्ग आहे मुंबई – दिल्ली एक्सप्रेस वे. हा प्रकल्प फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर देशातील जवळपास पाच ते सहा राज्यांसाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे.
या प्रकल्पामुळे दोन राजधान्या एकमेकांना कनेक्ट होणार आहेत. देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई ही दोन महत्त्वाची कॅपिटल शहरे या महामार्ग प्रकल्पामुळे कनेक्ट होतील आणि या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास कालावधी देखील या प्रकल्पामुळे निम्म्यावर येणार आहे.
हा प्रकल्प दिल्ली आणि मुंबई या दोन्ही शहरांना जलद आणि सोप्या मार्गाने जोडणारा आहे. या प्रकल्पामुळे देशातील एकात्मिक विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे आणि हा प्रकल्प मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे बोलले जाते.
यामुळे या प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पाचा काही भाग प्रवाशांसाठी खुला देखील करण्यात आला आहे मात्र हा प्रकल्प पूर्णपणे सुरू होण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.
मुंबई – दिल्ली एक्सप्रेस वे हा 1382 किलोमीटर लांबीचा महामार्ग राहणार आहे. मात्र हा महामार्ग विकसित करताना गुजरात आणि महाराष्ट्रात अडचणी येत आहेत. पण लवकरच या सर्व अडचणी दूर करून जलद गतीने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये याचे काम सुरू करण्यात येईल असे म्हटले जात आहे.
कधी पूर्ण होणार काम ?
या महामार्ग प्रकल्पाची डेडलाईन सातत्याने वाढवण्यात आली आहे. जेव्हा या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले तेव्हा हा प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण होईल असे म्हटले जात होते. मात्र 2023 मध्ये या प्रकल्पाचे काहीच काम पूर्ण झालेले नव्हते.
नंतर मग या प्रकल्पाचे डेडलाईन 2025 पर्यंत वाढवण्यात आली. ऑक्टोबर 2025 मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल असे म्हटले जात होते मात्र प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही.
त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याची डेडलाईन सुद्धा उलटणार आहे आणि आता नवीन डेडलाईन समोर येत आहे ती म्हणजे 2026. पुढील वर्षी म्हणजे 2026 मध्ये मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे पूर्णपणे प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
या नव्या एक्सप्रेस वे प्रोजेक्टमुळे मुंबई ते दिल्ली हा प्रवास अवघ्या बारा तासांमध्ये पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. सध्या मुंबई दिल्ली प्रवासासाठी 24 तासांचा वेळ लागतो मात्र या एक्सप्रेस वे च्या निर्मितीनंतर हा वेळ निम्म्याने कमी होणार आहे.