तब्बल 10000 कोटींची डील! विशाल मेगा मार्टमध्ये घडली मोठी उलथापालथ… नेमकं काय झालं?

Published on -

Vishal Mega Mart:- आजच्या शेअर बाजारात एक मोठी खळबळ उडाली. विशाल मेगा मार्ट या किरकोळ विक्री क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सने दिवसाची सुरुवातच मोठ्या घसरणीने केली. सकाळी बाजार उघडताच कंपनीचा शेअर तब्बल ७ टक्क्यांहून अधिक घसरला आणि तो थेट ११५.१० रुपयांवर स्थिरावला. यामागे कारण ठरला एक प्रचंड मोठं व्यवहार ज्याला ‘ब्लॉक डील’ म्हटलं जातं आणि त्याचे आर्थिक परिमाण होते तब्बल १०,००० कोटींपेक्षा अधिक.

या घसरणीमागे हे आहे प्रमुख कारण

विशाल मेगा मार्टच्या प्रमोटर कंपनीने समयट सर्व्हिसेस एलएलपी आपला मोठा हिस्सा विकल्याचं या व्यवहारातून स्पष्ट झालं. मार्च २०२५ अखेरपर्यंत समयट सर्व्हिसेसचा कंपनीमध्ये ७४.५५ टक्के हिस्सा होता. काल म्हणजे सोमवारच्या सत्रातच या व्यवहाराबाबतची चर्चा सुरू होती.तेव्हा असे समजले होते की कंपनी आपला सुमारे १० टक्के हिस्सा विकू शकते आणि त्याचा अंदाजे व्यवहार मूल्य ५,००० कोटी रुपये असेल. मात्र मंगळवारी सकाळी जे प्रत्यक्षात घडलं, त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

या ब्लॉक डीलमध्ये तब्बल ९३.५८ कोटी शेअर्स म्हणजे जवळपास २० टक्के इक्विटीचे हस्तांतरण झाले. हा व्यवहार ११५ रुपयांप्रमाणे झाला म्हणजेच सोमवारी शेअर ज्या किमतीवर बंद झाला होता, त्याच्या तुलनेत जवळपास ८ टक्के सवलतीने. त्यामुळे शेअरधारकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. हा सौदा नक्की कोणी खरेदी केला आणि कोणी विक्री केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

विशेष म्हणजे, या व्यवहाराचा काळ काहीसा नियोजनबद्ध वाटतो. कंपनीच्या आयपीओनंतर जे ‘लॉक-इन’ म्हणतात म्हणजे विशिष्ट कालावधीपर्यंत शेअर्स विकता येत नाहीत. तो कालावधी नुकताच संपला होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही ब्लॉक डील झाली. विशाल मेगा मार्टचा आयपीओ डिसेंबर २०२४ मध्ये आला होता आणि त्यावेळी एका शेअरची किंमत फक्त ७८ रुपये होती. आता काही महिन्यांतच हा शेअर ११५ रुपयांवर पोहोचला असला, तरी आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी सावध राहावं, हेच चित्र उभं राहतं.

अशाप्रकारे आपण बघितले की विशाल मेगा मार्टच्या शेअर्समध्ये झालेल्या या प्रचंड व्यवहारामुळे बाजारात हलकल्लोळ माजला आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ही घटना महत्त्वाची ठरते. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात शेअर्सचा व्यवहार नेहमी पाहायला मिळत नाही आणि त्याचे परिणाम शेअरच्या भविष्यातील हालचालींवरही होऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!