अवघ्या 5 वर्षात सामान्य गुंतवणूकदार झाले लखपती! वाचा सुझलॉन एनर्जी शेअरचे रहस्य

Published on -

Suzlon Energy Share Price:- शेअर बाजारात शुक्रवारी सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सनी पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं. सलग तिसऱ्यांदा मोठ्या ऑर्डर मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे शेअर्स ६३.५६ रुपयांवर व्यवहार करत होते. मागील काही वर्षांतील या शेअरच्या दरवाढीचा आलेख पाहिला तर हे वाढीचं चित्र फारच वेधक आहे. कारण अवघ्या पाच वर्षांत १.७० रुपयांवरून ६३ रुपयांपर्यंत मजल मारणं म्हणजे सुमारे ३६०० टक्क्यांची उडी या शेअरने घेतली आहे.

सुझलॉन एनर्जीला मिळाली तिसरी मोठी ऑर्डर

सुझलॉन एनर्जीने जाहीर केलं आहे की त्यांना AMPIN एनर्जी ट्रान्झिशनकडून १७०.१ मेगावॅट क्षमतेचा पवनऊर्जा प्रकल्प उभारण्याचा आदेश मिळाला आहे. विशेष म्हणजे ही या कंपनीकडून मिळालेली सलग तिसरी ऑर्डर आहे. प्रकल्पाची स्थापना आंध्र प्रदेशातील कुर्नूल इथं होणार आहे. यामध्ये सुझलॉनच्या अत्याधुनिक ५४ S144 विंड टर्बाइनचा समावेश असून, या प्रकल्पासाठी उपकरण पुरवठा, स्थापनेपासून देखभाल सेवांपर्यंतची जबाबदारीही सुझलॉनकडेच असणार आहे.

या ताज्या ऑर्डरमुळे AMPIN एनर्जीकडून सुझलॉनला मिळालेल्या एकूण ऑर्डरचा आकडा ३०३ मेगावॅटवर पोहोचला आहे. हे लक्षात घेतलं तर, कंपनीची बाजारातील पकड आणि ग्राहकांचा विश्वास याचा प्रत्यय येतो. पवनऊर्जा क्षेत्रात अशा प्रकारे सलग ऑर्डर मिळणं ही कंपनीच्या विश्वासार्हतेची आणि कार्यक्षमतेची साक्ष देणारी बाब आहे.

शेअरबाजारात सुझलॉन एनर्जी हे नाव अलीकडे एका ब्लॉक डीलमुळेही चर्चेत आलं होतं. कंपनीच्या प्रवर्तकांनी तब्बल १९.८ कोटी शेअर्स विक्रीस काढले, ज्यामुळे १३०० कोटींहून अधिक रक्कम जमा झाली. ही विक्री सरासरी ६६.०५ रुपये प्रति शेअर दराने झाली होती. त्यामुळे एकीकडे शेअरची किंमत वाढताना दिसत असली तरी काही प्रमाणात विक्रीचा कलही दिसून आला.

गेल्या 5 वर्षातील या शेअरचा प्रवास

पाच वर्षांतील प्रवास पाहिला तर कंपनीचे शेअर्स ३६०० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. २०२० मध्ये ज्या शेअर्सचे दर अवघे १.७० रुपये होते, ते आज ६३ रुपयांच्या वर पोहोचले आहेत. गेल्या तीन वर्षांत ८६० टक्के, दोन वर्षांत ३५५ टक्के आणि मागील एक वर्षात सुमारे २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. यातून सूचित होतं की, जरी सुरुवातीच्या टप्प्यावर अतिशय स्वस्त दराने व्यवहार झाले असले तरी गेल्या काही वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे.सध्या कंपनीचा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकापासून किंचित खाली आहे.म्हणजेच ८६.०४ रुपयांवरून तो सध्या ६३.५६ रुपये या पातळीवर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!