स्वप्नात ‘या’ गोष्टी दिसल्यास, समजा पैसे आलेच! वास्तुनुसार ही चिन्हं देतात धन आणि यश मिळण्याचे संकेत

Published on -

आपल्या दैनंदिन आयुष्यात एखाद्या चांगल्या गोष्टीची चाहूल कधी-कधी अगदी नकळत मिळते. आपण ती फक्त ‘योगायोग’ समजून दुर्लक्ष करतो, पण वास्तुशास्त्र सांगतं की अशा काही खास गोष्टी दिसणं म्हणजे नशिबाचा दरवाजा उघडण्यास सुरुवात झालेली असते. या शकुनांना योग्य वेळेस ओळखून त्याचा लाभ घेतला, तर जीवनात खरोखरच सकारात्मक बदल होऊ शकतो.

नीलकंठ पक्षी

वास्तुशास्त्रानुसार, अशी काही दृश्ये किंवा घटना आहेत ज्या केवळ सौंदर्य किंवा भावनिक अर्थाने नाही, तर ऊर्जेच्या दृष्टीनेही खूप महत्वाच्या असतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असताना नीलकंठ पक्षी पाहिला, तर हे खूप शुभ मानलं जातं. हा फक्त एक नयनरम्य पक्षी नाही, तर कामातील अडथळे दूर करून यशाकडे घेऊन जाणारा शकुनही आहे.

सकाळी गायीचे दर्शन

घरात सकाळी पूजा करताना मंदीरात सुगंध दरवळणं आणि त्या वेळी घराच्या दाराशी गाय येणं हे देखील अशाच शुभ शकुनांपैकी आहेत. अशा वेळी आपल्या घराच्या आसपासची नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात समृद्धीचा वास होतो असं मानलं जातं. यासोबतच जर कोणीतरी गरजू व्यक्ती किंवा भिकारी दरवाजाशी आला, तर त्याला मदतीचा हात देणं हे स्वतःसाठीही फार मोठं पुण्य मिळवून देणारं असतं.

प्रवासा आधी, जर तुमच्या नजरेस एखादी स्त्री आपल्या मांडीवर लहान बाळ घेऊन बसलेली दिसली, तर त्याला शुभ प्रवास आणि यशाचं संकेत मानलं जातं.अशा प्रसंगांमध्ये मनात विश्वास ठेवणं आणि आभार मानणं हे देखील महत्त्वाचं असतं.

 

देवाचं मंदिर किंवा मूर्ती स्वप्नात दिसणे

रात्र पडली, झोपेच्या कुशीत जाताना जर स्वप्नात देवाचं मंदिर, मूर्ती किंवा दिव्य दर्शन झालं, तर त्याला दुर्लक्ष करणं योग्य नाही. हे स्वप्न केवळ अकल्पित कल्पनांचा खेळ नसून, तुमच्या मनात आणि जीवनात सुरू असलेल्या अध्यात्मिक जागृतीचं सूचक असतं. अनेक लोक मानतात की अशा स्वप्नांनंतर आयुष्यात काहीतरी चांगला बदल घडतो. कधी नोकरीत यश, कधी कौटुंबिक समाधान, तर कधी आत्मविश्वासात वाढ.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!