अवघे 1 लाख गुंतवले आणि आज झाले 1.25 कोटी! बघा सामान्य माणसाला करोडपती बनवणाऱ्या शेअरची कमाल

Published on -

BEL Share Price:- आज शेअर बाजारात एक ठळक झळकती बातमी म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच BEL या नवरत्न कंपनीच्या शेअरने विक्रमी उच्चांक गाठला. सोमवारी, २३ जून रोजी BEL चा शेअर थेट ४१६.९५ रुपयांवर पोहोचला आणि त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वरचढ कामगिरी करणाऱ्या या शेअरने पुन्हा एकदा सिद्ध केलं की संयमाने गुंतवणूक करणाऱ्यांचं धन्य होणं अटळ आहे.

१ लाखाचे झाले १ कोटी २५ लाख

BEL ने मागील चार महिन्यांत सुमारे ६२ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. पण खरी कमाल तर गेल्या दहा वर्षांची आहे. २०१५ साली जर कोणी फक्त १ लाख रुपये या शेअरमध्ये गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य १ कोटी २५ लाख रुपयांहून अधिक झाले असते आणि ही कमाई केवळ शेअरच्या भाववाढीमुळेच नाही, तर कंपनीने वेळोवेळी दिलेल्या बोनस शेअर्सचा मोठा वाटा आहे.

BEL ने शेअरहोल्डर्सना मागील दशकात तीन वेळा बोनस शेअर्स दिले. २०१५ मध्ये २:१ म्हणजेच प्रत्येक १ शेअरला २ बोनस शेअर्स, २०१७ मध्ये १:१० आणि २०२२ मध्ये पुन्हा २:१ प्रमाणात बोनस दिला. या बोनस शेअर्समुळे मूळ गुंतवणुकीचे प्रमाण वाढत गेले आणि त्याचाच परिणाम म्हणून, १२ जून २०१५ रोजी घेतलेल्या ३०४० शेअर्सची संख्या वाढून आज ३०,०९६ वर पोहोचली आहे.

सध्याच्या बाजारभावानुसार हे ३०,०९६ शेअर्स ४१६.९५ रुपये दराने विकले तर त्याचे एकूण मूल्य सुमारे १.२५ कोटी रुपये होते. याचा अर्थ असा की, संयमाने आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून गुंतवणूक करणाऱ्यांनी खरंच मोठा नफा कमावला आहे.

ताज्या घडामोडींमध्ये BEL ला नुकतीच ५८५ कोटी रुपयांची नवी ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर मुख्यतः क्षेपणास्त्र, दृष्टी प्रणाली, जॅमर, महत्त्वाचे सुटे भाग आणि संरक्षणाशी संबंधित उपकरणांकरिता आहे. त्यामुळे कंपनीच्या उत्पन्नात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्याचा लाभ भविष्यातील शेअर किंमतीवरही दिसून येऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!