Pune Metro News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पुण्यातील मेट्रो संदर्भात. खरे तर सध्या स्थितीला पुणे शहरातील दोन मेट्रो मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू आहेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट हे दोन मेट्रो मार्ग महा मेट्रो कडून संचालित केले जात आहेत.

दुसरीकडे आता या मेट्रो मार्गांचे विस्तारीकरणाला सुद्धा गती देण्यात आली आहे. खरे तर आज पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीत पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे.
या दोन महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांना मंजुरी
या बैठकीत वनात ते रामवाडी या मेट्रोमार्गाच्या विस्तारीकरणाला मान्यता मिळाली आहे. या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरण प्रकल्प अंतर्गत दोन नवीन मेट्रो कॉरिडॉर तयार होणार आहेत.
कॉरिडोर 2 अ म्हणजे वनाज ते चांदणी चौक आणि कॉरिडोर 2 ब म्हणजे रामवाडी ते वाघोली / विठ्ठलवाडी हे दोन विस्तारित मेट्रो कॉरिडोर विकसित केले जाणार असून आज याच दोन्ही कॉरिडॉरला केंद्रातील सरकारकडून मंजुरी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.
कसे असणार हे नवीन मेट्रो मार्ग
वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली / विठ्ठलवाडी या दोन्ही मेट्रो मार्गांची एकत्रित लांबी जवळपास 12.75 किलोमीटर इतकी राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या विस्तारित मेट्रो मार्ग प्रकल्प अंतर्गत एकूण 13 स्टेशन्स विकसित होणार आहेत. केंद्राने मंजुरी दिलेल्या या मेट्रो मार्गांमुळे चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली या महत्त्वाच्या परिसराला मेट्रो मार्गाची जोड मिळणार आहे.
खरे तर पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 3626 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महत्त्वाची बाब अशी की या प्रकल्पासाठी जो खर्च येईल तो खर्च केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि बाह्य द्विपक्षीय/ बहुपक्षीय एजन्सी समप्रमाणात वाटून घेणार आहेत.
या विस्तारित मेट्रो मार्गांचे सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे नवीन कॉरिडॉर जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्टेशनवर लाईन-1 (निगडी-कात्रज) आणि लाईन-3 (हिंजवडी-जिल्हा न्यायालय) सोबत देखील एकत्रित केले जाणार आहेत.
यामुळे पुणे शहरातील बहुतांशी भागात मेट्रो ने कनेक्ट होणार आहे. शहराचा जो परिसर अजून मेट्रोच्या नकाशावर आलेला नव्हता तो भाग देखील या निर्णयामुळे मेट्रोच्या नकाशावर येणार आहे.
यामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर खऱ्या अर्थाने लगाम लावता येईल अशी आशा जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे. तथापि या प्रकल्पांचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे आणि हे प्रकल्प लवकरात लवकर सर्वसामान्यांसाठी खुले व्हावेत अशी सर्वसामान्य पुणेकरांची आशा आहे.