महाराष्ट्रात तयार होणार 5 नवीन महामार्ग ! कसे असणार रूट ?

महाराष्ट्राला आगामी काळात 5 नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील रस्ते कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार असून आज आपण याच प्रस्तावित महामार्ग प्रकल्पांची माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात रस्त्यांचे नेटवर्क फारच मजबूत करण्यात आले आहे. राज्यात गेल्या काही वर्षांच्या काळात विविध महामार्ग प्रकल्पांचे कामे पूर्ण झाली आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबई आणि नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण देखील पूर्ण झाले आहे.

अर्थातच समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने खुला झाला आहे. यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास वेगवान झाला. दुसरीकडे आगामी काळात महाराष्ट्राला आणखी काही नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून येत्या काही वर्षात अनेक महामार्ग विकसित केले जाणार आहेत आणि आज आपण याचपैकी पाच महत्त्वाच्या महामार्गाची माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्रात तयार होणार 5 नवीन महामार्ग 

  1. जालना नांदेड महामार्ग : समृद्धी महामार्गाचा विस्तार म्हणून जाणला नांदेड महामार्ग विकसित केला जाणारा. जालना – नांदेड समृद्धी एक्स्प्रेसवे कनेक्टर हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विकसित केला जाईल. हा प्रकल्प 179 किलोमीटर लांबीचा आणि सहा पदरी राहणार आहे. सध्या हा प्रकल्प अंडर कन्स्ट्रक्शन आहे. 
  2. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग : नागपूर ते गोवा दरम्यान 802 किलोमीटर लांबीचा शक्तिपीठ महामार्ग विकसित केला जाणार आहे. हा महामार्ग प्रकल्प राज्यातील तीन महत्त्वाच्या शक्तिपीठांना कनेक्ट करणार आहे. कोल्हापूर, तुळजापूर आणि माहूर येथील तीन शक्तिपीठ या महामार्गामुळे कनेक्ट होतील. याशिवाय इतरही अनेक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र या महामार्गामुळे जोडले जाणार आहेत. हा महामार्ग सहा पदरी राहणार असून याची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून होणार आहे आणि समाप्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे होईल. सध्या स्थितीला या महामार्ग प्रकल्पासाठी जमिनीचे भूसंपादन सुरू आहे. 
  3. शहाबाज – पत्रादेवी कोकण एक्स्प्रेसवे : हा महामार्ग प्रकल्प 389 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. हा एक प्रवेश नियंत्रित महामार्ग राहील आणि सहा लेनचा असेल. दरम्यान या सहा पदरी महामार्गासाठीचा सुधारित डीपीआर नुकताच तयार करण्यात आला असून या प्रकल्पाला अजून अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पूर्ण केला जाणार आहे. 
  4. पुणे – शिरूर इलेव्हटेड कोरीडोर + शिरूर – छ. संभाजी नगर एक्स्प्रेसवे : हा प्रकल्प 260 किलोमीटर लांबीचा सहा पदरी प्रकल्प राहणार आहे. या प्रकल्पाचे काम एम एस आय डी सी कडून केले जाणार आहे. MSIDC कडून विकसित केल्या जाणाऱ्या या प्रकल्पापैकी पुणे ते शिरूर दरम्यानच्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे तर दुसरीकडे शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या टप्प्यासाठी सुधारित डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. 
  5. पुणे – बेंगलुरू एक्स्प्रेसवे : हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पूर्ण केला जाणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी 700 km एवढी राहील. हा एक आठ पदरी महामार्ग राहणार आहे. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर या प्रकल्पाला अजून केंद्राची अंतिम मंजुरी मिळालेली नाही. मात्र लवकरच या प्रकल्पाला केंद्राकडून अंतिम मंजुरी प्रदान केली जाईल आणि त्यानंतर या प्रकल्पाची पुढील कारवाई सुरू होणार आहे. 
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!