RBI New Rule 2025: तुम्ही देखील चेकने व्यवहार करतात? आता येत आहे आरबीआयची नवी क्लियरन्स सिस्टम…वाचा माहिती

Published on -

RBI New Rule 2025:- आता जर आपण पैशांच्या संबंधित असलेले व्यवहार बघितले तर मोठ्या प्रमाणावर यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार पूर्ण केले जातात. तसेच काही व्यवहारांसाठी बँकेच्या माध्यमातून आरटीजीएस किंवा एनईएफटी सारखे पर्याय देखील वापरले जातात. अगोदर चेक म्हणजे धनादेशच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्यवहार केले जायचे व आता देखील केले जातात. परंतु यामध्ये चेक क्लिअर व्हायला लागणारा जो काही कालावधी आहे यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण व्हायच्या. सध्या जर आपण चेक क्लिअर होण्यासाठीचा कालावधी बघितला तर तो साधारणपणे दोन दिवसापर्यंत आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार आता चेक क्लिअरन्स सिस्टम मध्ये खूप मोठा बदल होणार असून हा बदल रिझर्व बँकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे व 4 ऑक्टोबर पासून हा बदल लागू होईल अशी माहिती समोर आलेली आहे.

4 ऑक्टोबर पासून लागू होणार नवीन चेक क्लियरन्स सिस्टम

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 4 ऑक्टोबर पासून रिझर्व बँक ऑफ इंडिया चेक क्लिअर सिस्टममध्ये खूप मोठा बदल करणार असून हे बदल साधारणपणे 4 ऑक्टोबर पासून लागू होतील. याचा फायदा असा होईल की आता चेक दिल्यानंतर काही तासांमध्ये वटला जाईल व खात्यात पैसे जमा होतील. सध्याचे क्लिअर व्हायला साधारणपणे दोन दिवसांचा कालावधी लागतो व हा कालावधी कमी होऊन आता काही तासांवर येणार आहे. ही चेक क्लिअरन्स सिस्टम लागू झाल्यानंतर बँका चेक स्कॅन करतील व तो सादर करतील आणि काही तासात तो पास देखील करतील.

समजा तुम्ही सकाळी चेक जमा केला तर त्याच दिवशी दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात इतकी सहजता आता चेकच्या संदर्भातील व्यवहारांमध्ये येऊ शकते. या नवीन चेक ट्रंकेशन सिस्टममध्ये चेक इकडे तिकडे पाठवण्याची गरज भासणार नाही. या प्रणालीत चेक स्कॅन केला जाईल व त्याची डिजिटल प्रतिमा तयार केली जाते आणि ती प्रतिमा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत जाऊन जलद प्रक्रिया होऊन चेक लवकर वटेल. डिजिटल इंडियाला चालना देण्यासाठी आरबीआयचे हे पाऊल नक्कीच महत्त्वपूर्ण असून चेक जितक्या लवकर क्लिअर होण्यास मदत होईल तितके लोक डिजिटल पेमेंटसह मोठ्या प्रमाणावर आणि आत्मविश्वासाने चेक वापरू शकतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe