Silver Price: 1 सप्टेंबर 2025 नंतर चांदी खरेदी करणार आहात? तर वाचा ही फायद्याची बातमी

Published on -

Silver Price:- भारतामध्ये फार पुरातन काळापासून सोन्या आणि चांदीचे दागिने खरेदी करण्याची एक परंपरा आहे. तसेच सणासुदीच्या कालावधीमध्ये किंवा एखाद्या खास मुहूर्तावर सोने-चांदीची खरेदी लक्षणियरीत्या वाढल्याचे आपल्याला दिसून येते. सध्या जर आपण सोने आणि चांदीचे दर पाहिले तर ते एक लाखाच्या पार आहेत. परंतु तरी देखील सोने आणि चांदीची खरेदी कमी होताना आपल्याला दिसून येत नाही. परंतु बऱ्याचदा सोने-चांदी खरेदी करताना देखील बनावट दागिन्यांच्या स्वरूपामध्ये फसवणूक होण्याची शक्यता असते.

अशाप्रकारे सोने चांदी खरेदी करताना फसवणूक होऊ नये म्हणून सोन्यावर हॉलमार्किंग लागू करण्यात आलेले आहे. आपल्याला माहित आहे की सोन्याची शुद्धतेची हमी आपल्याला हॉलमार्कीगच्या माध्यमातून मिळत असते. परंतु अजूनपर्यंत चांदीसाठी मात्र हॉलमार्किंग लागू नव्हती. परंतु आता सरकार चांदीच्या दागिन्यांसाठी देखील हॉलमार्किंग लागू करणार असून मिळालेल्या माहितीनुसार 1 सप्टेंबर पासून हॉलमार्किंग लागू केले जाणार आहे. यामुळे चांदीच्या दागिन्यांमध्ये वापरलेली चांदी किती शुद्ध आहे हे हॉलमार्क सिद्ध करेन व त्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढण्यास मदत होईल. अगदी सोन्याप्रमाणे चांदीच्या दागिन्यांच्या सहा ग्रेडवर ही हॉलमार्किंग लागू होणार असून याकरिता सहा अंकी HUID हॉलमार्किंग लागू होणार आहे.

चांदीच्या दागिन्यांवर कधी येणार हॉलमार्किंग आणि काय मिळतील फायदे?

साधारणपणे 1 सप्टेंबर पासून चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लागू होणार आहे. हॉलमार्किंग एक सरकारी प्रमाणपत्र असते जे चांदी किंवा सोन्याचे दागिने किती शुद्ध आहेत याची ग्राहकांना हमी देत असते. सोन्याप्रमाणे चांदीवर देखील एक विशेष चिन्ह असणार आहे जे चिन्ह चांदी किती शुद्ध आहे हे ग्राहकांना सांगणार आहे. यामुळे ग्राहकांना मिळणारे फायदे बघितले तर हॉलमार्किंगमुळे ग्राहक खरेदी करत असलेले चांदी किती शुद्ध आहे हे कळणार आहे. सोनारांना देखील आता भेसळयुक्त चांदी विकता येणार नाही.

मनामध्ये तुमची फसवणूक तर होत नाही ना या प्रकारची भीती राहणार नाही. बऱ्याचदा आपण जेव्हा चांदी खरेदी करतो तेव्हा संबंधित दागिन्यांमध्ये चांदी कमी आणि इतर धातूंचे प्रमाण जास्त असते व आपली फसवणूक होते. परंतु आता हॉलमार्किंग मुळे अशा पद्धतीची फसवणूक थांबणार आहे. तसेच तुम्ही खरेदी केलेले चांदीचे दागिने विकायचे असतील तर हॉलमार्क केलेल्या चांदीचे दागिन्यांवर लोकांचा जास्त विश्वास असेल व त्यांची चांगली किंमत तुम्हाला मिळू शकेल.

हे हॉलमार्किंग कसे काम करेल?

हॉलमार्किंग प्रणालीत चांदीच्या दागिन्यांवर एक विशेष चिन्ह लावले जाईल व त्यामध्ये सहा अंकी युनिक कोड असेल व तो प्रत्येक दागिन्यांसाठी वेगवेगळा असतो. हा कोड ग्राहकांना सांगतो की दागिने बीआयएसच्या मानांकानुसार तपासले गेले आहेत. याअंतर्गत चांदीकरिता 800, 835,900,925,970 आणि 990 असे सहा ग्रेड असणार आहेत व या सहा ग्रेड नुसार चांदीची शुद्धता किती आहे हे ग्राहकांना समजणार आहे. त्यामुळे तुम्ही 1 सप्टेंबरनंतर जर चांदी खरेदी करत असाल तर हॉलमार्क तपासल्या शिवाय ती खरेदी करू नका.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe