Business Idea: फक्त 2 हजाराची गुंतवणूक आणि काही तास काम! महिन्याला कमवाल 20 ते 25 हजार

Published on -

Business Idea: तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याकरिता पैशांची गुंतवणूक खूप गरजेची असते. परंतु व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला लाखो रुपये लागतात असे काही नाही. अगदी काही हजार रुपयांमध्ये तुम्ही व्यवसायाला सुरुवात करू शकतात व त्यामध्ये मधून महिन्याला 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत कमाई अगदी आरामात करू शकतात. फक्त यासाठी योग्य व्यवसायाची निवड व त्यासाठी लागणारे कष्ट हे तुमच्या मध्ये असणे गरजेचे असते. या अनुषंगाने आपण या लेखामध्ये अशा सोप्या व्यवसायाची थोडक्यात माहिती बघणार आहोत जो तुम्हाला अगदी दोन हजार रुपयांमध्ये सुरू करता येतो व त्या माध्यमातून तुम्ही महिन्याला 20 ते 25 हजार रुपये अगदी आरामात कमावू शकतात. चला तर मग या लेखात आपण या संबंधीची माहिती बघू.

लेमन टी आणि मसाला टी विक्री व्यवसाय

आता आपण अनेक चहा विक्रेते बघतो. अगदी रस्त्याच्या कडेला एखादी हात गाडी लावून त्यांनी त्यांचा व्यवसाय थाटलेला असतो. परंतु व्यवसायाचे स्वरूप किंवा त्याचा विस्तार जरी छोटा असला तरी त्या माध्यमातून बरेचसे चहा विक्रेते दिवसाला हजार ते दीड हजार रुपये निव्वळ नफा देखील मिळवतात. याच व्यवसायामध्ये जर तुम्ही लिंबू चहा म्हणजेच लेमन टी किंवा मसाला टी बनवून तो चहा विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला तर तुम्हाला फक्त दोन हजार रुपयांची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची जोखीम किंवा उत्पादनाचे नुकसान होण्याची भीती न बाळगता तुम्ही साईड बिझनेस म्हणून देखील या व्यवसायाची निवड करू शकता.

अगदी छोट्याशा कौशल्याने तुम्ही या व्यवसायामध्ये जम बसवू शकतात. यात तुम्ही स्वादिष्ट चहा कशी बनवावी हे शिकणे खूप गरजेचे आहे व ते शिकल्यानंतर तुमच्याकडे आपसूकच मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी वाढू शकते. लाखो रुपये टाकून एखादा व्यवसाय सुरू करण्यापेक्षा तुम्ही कमी जोखमीचा व कमीत कमी गुंतवणुकीचा लेमन टी किंवा मसाला टी विक्रीचा व्यवसाय सुरू करून श्रीमंतीच्या दिशेने वाटचाल करू शकतात. या व्यवसायासाठी लागणारे आवश्यक साहित्य जर बघितले तर एक किटली तसेच एक हजार रुपयाचा गॅस स्टोव्ह आणि पाचशे रुपयांचा चहा साठी लागणारा कच्चामाल इत्यादी खरेदी करून तुम्ही तुमच्या व्यवसायाला सुरुवात करू शकतात.

व्यवसायाची सुरुवात कशी कराल?

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला मोठ्या जागेची आवश्यकता नाही. एखाद्या बाजारपेठेच्या व गर्दीच्या ठिकाणी तुम्ही अगदी टेबल लावून किंवा हात गाडीवर देखील या व्यवसायाला सुरुवात करू शकतात. चहाची कॉलिटी मेंटेन करून तुम्ही हळूहळू तुमची ग्राहक संख्या वाढवू शकतात व यामध्ये कालांतराने वाढ झाल्यानंतर तुम्ही मोठ्या दुकानाचा विचार करू शकतात. त्यामुळे अगदी छोट्याशा जागेत तुम्ही हा व्यवसाय सुरू करून महिन्याला 25 ते 30 हजार रुपये अगदी आरामात कमवू शकता. विशेष म्हणजे चहा स्वादिष्ट होण्यासाठी आवश्यक मसाले बनवता येणे खूप गरजेचे आहे.

यासाठी तुम्ही जिरे तसेच दालचिनी, सुके आले इत्यादी पदार्थांचा वापर करून घरीच मसाले तयार करू शकतात. मसाले कसे बनवावे याची चांगली माहिती घेऊन तुम्ही स्वादिष्ट मसाले तयार करून ते चहात घालून जर चहा विकली तर नक्कीच याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला ग्राहकांच्या वाढीवर दिसून येईल. तसेच तुम्ही अगदी सकाळ आणि संध्याकाळ काही तास जरी हा व्यवसाय केला तरी तुम्ही हजारो रुपये महिन्याला कमवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News