Multibagger Stock:- एकंदरीत जर आपण संपूर्ण ऑगस्ट महिना बघितला तर यामध्ये शेअर बाजारात चढउतार दिसून आला व जास्त दिवस घसरणच पाहायला मिळाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे ऑगस्ट महिन्यामध्ये खूप मोठे आर्थिक नुकसान झाले. परंतु जर संपूर्ण बाजाराचे विश्लेषण बघितले तर यामध्ये काही कंपन्यांचे शेअर्स या घसरणीच्या कालावधीत देखील वधारल्याचे दिसले व गुंतवणूकदारांना 50 ते 60 टक्क्यांपर्यंत परतावा मिळण्यास मदत झाली. यात प्रामुख्याने एचबीएल इंजीनियरिंग, शैली इंजिनिअरिंग प्लास्टिक, शारदा एनर्जी अँड मिनरल्स आणि अपोलो मायक्रो सिस्टम्स शेअर्सचा समावेश आहे. शुक्रवारी या चारही शेअर्सच्या किमतीत साधारणपणे 12 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. ऑगस्ट महिन्यात बघितले तर या चारही शेअर्समध्ये 36 ते 56% पर्यंत वाढ नोंदवण्यात आली.
या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 50% पेक्षा जास्त परतावा
1- अपोलो मायक्रो सिस्टम- ही संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील अतिशय महत्त्वपूर्ण अशी कंपनी असून या कंपनीच्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांची वाढ दिसून आली व हा शेअर सध्या 271.60 रुपयांवर पोहोचलेला आहे. 31 जुलैला याची किंमत 174 रुपये होती. तर 29 ऑगस्टला 271 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर हा शेअर पोहोचला.

2- शैली इंजीनियरिंग प्लास्टिक- शैली इंजिनिअरिंग प्लास्टिकचे शेअर्स इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सहा टक्क्यांनी वाढले व 2230.15 वर पोहोचले आहेत. ऑगस्ट महिन्यात या शेअर्समध्ये 41 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली
3- एचबीएल इंजीनियरिंग- शुक्रवारी इंट्राडे ट्रेडमध्ये एचबीएल इंजिनिअरिंगच्या शेअर्समध्ये 5% ची वाढ पाहायला मिळाली व या वाढीसह हे शेअर 819.80 रुपयांवर पोहोचले आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये यात 40 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्या या कंपनीची एकूण ऑर्डर बुक 4083.17 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.