LIC Scheme: मुलांच्या शिक्षणाचे टेन्शन सोडा! एलआयसीची ‘ही’ योजना देईल 26 लाख…. इथे पहा माहिती

Published on -

LIC Scheme: प्रत्येक पालकांना त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाच्या विषयी खूप मोठ्या प्रमाणावर काळजी असते. आजच्या महागाईच्या कालावधीमध्ये शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या खूप महाग होत चालले असून याकरिता आतापासूनच सगळे आर्थिक नियोजन करून ठेवणे खूप फायद्याचे ठरते. त्यामुळे बरेच पालक अगदी मुलांच्या जन्मापासूनच त्यांच्या पुढील आर्थिक भविष्याविषयीची तरतूद करायला सुरुवात करतात व वेगवेगळ्या अशा गुंतवणूक पर्यायांमध्ये मुलांसाठी गुंतवणूक करतात. यामध्ये अनेक बँकांच्या तसेच पोस्ट ऑफिसच्या योजना फायद्याच्या ठरतात. परंतु त्यासोबतच सुरक्षित गुंतवणूक आणि उत्तम परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून लोकप्रिय असलेल्या एलआयसीच्या योजना देखील तितक्याच फायद्याच्या आहेत. अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाच्या बाबतीत चिंता असेल तर तुम्ही एलआयसीच्या जिवन तरुण पॉलिसीचा विचार करू शकतात. कारण एलआयसीच्या माध्यमातून ही योजना फक्त मुलांचे शिक्षण व तरुणाईच्या गरजा डोळ्यासमोर ठेवूनच तयार करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये अगदी कमीत कमी गुंतवणूक करून मुलांच्यासाठी लाखो रुपये आपल्याला जमा करता येऊ शकतात. चला तर मग या योजनेची माहिती या लेखात बघू.

एलआयसीच्या जीवन तरुण पॉलिसीचे वैशिष्ट्य काय?

मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि त्यांच्या तरुणाईच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या गरजा डोळ्यासमोर ठेवून एलआयसीने जीवन तरुण पॉलिसी डिझाईन केलेली आहे. ही अतिशय महत्त्वाची योजना असून अगदी छोट्या पद्धतीने तुम्ही गुंतवणूक केली तरी यामध्ये तुम्ही मोठा निधी निर्माण करू शकतात. या योजनेमध्ये दररोज दीडशे रुपये म्हणजेच महिन्याला 4500 रुपयांचे गुंतवणूक करू शकतात व यातून तुम्हाला 26 लाख रुपयांचा निधी मिळू शकतो. हे 26 लाख मुलांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून पुरेसे असून यांच्या इतर गरजा देखील या माध्यमातून पूर्ण होऊ शकतात. ही मर्यादित प्रीमियम पेमेंट योजना आहे. परंतु यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणुकीचा लाभ तर मिळतोच परंतु विमा संरक्षण देखील मिळते. या पॉलिसीमध्ये निश्चित कालावधीसाठी प्रीमियम भरला जातो आणि जेव्हा मूल 25 वर्षाचे होते तेव्हा एकरकमी रक्कम मिळते. समजा तुमचे मुल एक वर्ष वयाचे आहे व तेव्हापासून तुम्ही ही पॉलिसी सुरू केली व महिन्याला चार हजार पाचशे रुपये आणि वर्षाला 54 हजार रुपये याप्रमाणे यामध्ये गुंतवणूक 25 वर्षांकरिता सुरू ठेवली तर पॉलिसीच्या शेवटी तुम्हाला 26 लाख रुपयांची रक्कम मिळू शकते. या एकूण रकमेमध्ये विम्याची रक्कम तसेच वर्षाला मिळणारा बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस देखील समाविष्ट असू शकतो.

या योजनेचे इतर वैशिष्ट्ये

या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर मुलाचे कमीत कमी वय 90 दिवस आणि कमाल वय 12 वर्षे असणे गरजेचे आहे. या पॉलिसीचा एकूण कालावधी हा मुलांच्या सध्याचे वय काय आहे या आधारावर ठरवला जात असतो. म्हणजेच मूल एक वर्षाचे असताना जर पॉलिसी सुरू केली तर या योजनेचा कालावधी हा पंचवीस वर्षाचा असतो व जर मूल पाच वर्षाच्या असेल तर कालावधी हा वीस वर्षाचा असतो. या योजनेच्या सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेतून तुम्ही योजनेचा कालावधीत संपण्याअगोदर देखील पैसे काढू शकतात. तसेच मुल वीस वर्षाचे झाल्यावर किंवा 24 वर्षांचे होईपर्यंत प्रत्येक वर्षाला मनी बॅकच्या रूपात एक निश्चित रक्कम देखील परत मिळू शकते. तसेच 25 व्या वर्षी पॉलिसीचे संपूर्ण मॅच्युरिटी रक्कम तुम्हाला एकत्रितपणे मिळू शकते. तसेच या योजनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे या पॉलिसीमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर आयकर नियम 80सी अंतर्गत तुम्हाला करात सवलत देखील मिळते. तसेच पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर तुम्हाला मिळालेली रक्कम किंवा अपघात झाल्यास मिळणारे डेथ बेनिफिट देखील पूर्णपणे करमुक्त आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe