Post Office Scheme: पोस्टाची ‘ही’ योजना व्याजातून बनवेल लखपती! 5 वर्षात मिळेल 5 लाख रुपये व्याज… कसे ते वाचा

Published on -

Post Office Scheme:- सध्याच्या धकाधकीच्या आणि अनिश्चित अशा वातावरणामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे अतिशय गरजेचे आहे. तसेच कुठली परिस्थिती व्यक्तीवर कोणत्या वेळी येईल याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नसल्यामुळे आर्थिकदृष्ट्या समृद्ध राहणे अतिशय गरजेचे आहे. परंतु आर्थिकदृष्ट्या समृद्ध राहायचे असेल तर त्याकरिता आपण करत असलेल्या कमाईतून बचत आणि त्या बचतीची गुंतवणूक करणे अतिशय गरजेचे आहे. इतकेच नाही तर आपण गुंतवत असलेला पैसा हा सुरक्षित राहणे देखील तितकेच महत्त्वाचे असल्यामुळे गुंतवणूक पर्यायांचा विचार करताना खूप बारकाईने निर्णय घेणे गरजेचे आहे. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही देखील सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असाल व तुम्हाला उत्तम असा परतावा देखील हवा असेल तर तुमच्याकरिता पोस्ट ऑफिसच्या योजना खूप फायद्याच्या ठरू शकतात. यामध्ये पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट ही अतिशय महत्त्वाची योजना आहे व ही गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.

नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजनेचे वैशिष्ट्ये

पोस्ट ऑफिसची ही एक महत्त्वाची स्मॉल सेविंग स्कीम म्हणजेच छोटी बचत योजना असून हा गुंतवणुकीसाठी एक लोकप्रिय असा पर्याय आहे. या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गुंतवणूकदाराला जो काही व्याजाचा लाभ मिळतो तो दरवर्षी चक्रवाढ पद्धतीने वाढत जातो. सध्या या योजनेत जर गुंतवणूक केली तर त्यावर 7.7% वार्षिक व्याज देण्यात येत आहे व या व्याजावर जेव्हा चक्रवाढीचा म्हणजेच कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो तो गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढवण्यास खूप मोठ्या प्रमाणावर मदत करत असतो.

पाच वर्षात पाच लाख व्याज कसे मिळवाल?

या योजनेमध्ये पाच वर्षात पाच लाख रुपये व्याज स्वरूपात मिळवता येतात. पण याकरिता तुम्हाला या योजनेत एकाच वेळी अकरा लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल व या अकरा लाख रुपयांवर पाच वर्षानंतर चक्रवाढ व्याजासह गुंतवणूकदाराला 15 लाख 93 हजार 937 रुपये मिळतात. म्हणजेच या रकमेत 4 लाख 93 हजार 937 रुपये फक्त पाच वर्षात नुसते व्याजापोटी मिळण्यास मदत होते. परंतु तुम्ही या योजनेत एक हजार रुपये गुंतवून खाते उघडू शकतात व कमाल कितीही पैशांची गुंतवणूक करू शकतात. या योजनेचा कालावधी हा पाच वर्षांसाठी असतो. महत्वाचे म्हणजे या योजनेत आयकर कलम 80C अंतर्गत एका वर्षात दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe