Silver Market:- सध्या जर आपण सोन्या चांदीचे दर बघितले तर त्यांनी नवीन रेकॉर्ड स्थापित केला असून एक लाखाचा टप्पा सध्या पार केलेला आहे. भारतामध्ये सोने आणि चांदी खरेदीची फार पूर्वापार परंपरा आहे. सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीची खरेदी केली जाते. परंतु बऱ्याचदा सोन्या-चांदीची खरेदी करताना बनावट दागिन्यांमुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी सोन्याच्या दागिन्यांवर अगोदरपासून हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आलेली आहे. परंतु अशा प्रकारचे सुविधा अजून पर्यंत चांदीच्या दागिन्यांच्या बाबतीत नव्हती. परंतु आता प्रशासनाने यावर निर्णय घेतला असून सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे आता चांदीसाठी देखील हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक सप्टेंबर 2025 पासून चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचा नवा नियम लागू केला जाईल अशी शक्यता आहे. सुरुवातीला हा नियम ऐच्छिक स्वरूपाचा असणार आहे. म्हणजेच ज्या ग्राहकांना हॉलमार्क असलेली चांदी खरेदी करायची आहे ते खरेदी करू शकतात किंवा ज्यांना हॉलमार्क नसलेल्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी करायची असेल तर ते देखील ग्राहकांना करता येणार आहे.
कशा पद्धतीने होणार हा बदल?
भारतीय मानक ब्युरो अर्थात बीआयएसच्या माध्यमातून चांदीच्या शुद्धतेकरिता सहा मानक ठरवण्यात आले आहेत व हे सहा मानक म्हणजे 600,835,900,925,970 आणि 990 हे ते सहा मानक असणार आहेत. नवीन नियमानुसार प्रत्येक हॉलमार्क असलेले चांदीच्या दागिन्यांवर सहा अंकी युनिक कोड असणार आहे.यानुसार चांदीच्या दागिन्यांची शुद्धता किती प्रमाणामध्ये आहे किंवा तो बनावट तर नाही ना याबद्दलची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे फसवणुकीचा कुठलाही संबंध यामध्ये राहणार नाही.

ग्राहकांना काय होणार फायदा?
बऱ्याचदा बाजारामध्ये चांदीच्या दागिन्यांमध्ये भेसळ होण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता असते. पण नव्या हॉलमार्क आणि एचयूआयडी नंबरमुळे ती शक्यता कमी होऊ शकते. ग्राहकांना आता बीआयएस केअर अँपचा वापर करून व्हेरिफाय एचयुआयडी फिचरच्या मदतीने दागिन्यांवरील कोड खरा आहे की नाही हे सहज तपासता येणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना चांदीच्या दागिन्यांची अधिक सुरक्षित पद्धतीने खरेदी करता येणार आहे व यामध्ये फसवणुकीचा कुठलाही धोका राहणार नाही.