CIBIL Score:- कुठलेही प्रकारचे कर्ज जर तुम्ही बँकेत घ्यायला गेलात तर सगळ्यात अगोदर बँकांकडून किंवा इतर एनबीएफसी अर्थात नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांकडून सिबिल स्कोर तपासला जातो हे आपल्याला माहिती आहे. हा स्कोर 300 ते 900 या अंकादरम्यान गणला जातो व या माध्यमातून बँकांना एखाद्या व्यक्तीचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीचा आहे हे समजत असते व त्यावरून बँकांना एखाद्या व्यक्तीला कर्ज द्यायचे की नाही यासंबंधीचा निर्णय घेणे सोपे होते. जर तुमचा सिबिल स्कोर घसरलेला म्हणजेच खराब असेल तर तुम्हाला कुठल्याही बँकेकडून कर्ज सहजासहजी मिळत नाही आणि मिळालेच तर व्याजदर जास्त आकारला जातो. परंतु आता या सगळ्या परिस्थितीवर मात्र एक सकारात्मक आणि दिलासादायक माहिती समोर आलेली आहे. त्यासंबंधीचीच माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
कर्जासाठी सिबिल स्कोर निकष मानला जाणार नाही?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जर एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोर 300 च्या जवळ किंवा 600 च्या खाली असेल तर बँकांच्या माध्यमातून अशा व्यक्तीला कर्ज दिले जात नाही किंवा टाळाटाळ केली जाते. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार बघितले तर आता सिव्हिल स्कोर हा कर्जाच्या बाबतीत निकष मानला जाणार नाही. कारण यावर संसदेत सरकारने म्हटले आहे की जर एखाद्याचा सिबिल स्कोर खराब असेल तर बँक कर्ज द्यायला नकार देऊ शकत नाही. जरी सिविल स्कोर खराब किंवा कमी असेल तर अशा परिस्थितीमध्ये लोकांना बँक कर्ज द्यायला नकार देणार नाहीत. समजा एखादा व्यक्ती पहिल्यांदाच कर्जासाठी अर्ज करत असेल तर अशा परिस्थितीत बँक त्याचा सिविल स्कोर विचारणार नाही.

या मुद्द्यावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत माहिती दिली. त्यांनी रिझर्व बॅंकेच्या याबाबत असलेल्या नियमांबद्दल उल्लेख केला. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमांमध्ये कुठेही सिबिल स्कोरसाठी किमान क्रमांकाचा उल्लेख हा करण्यात आलेला नाही. त्यांच्या या वाक्याचा अर्थ असा आहे की कर्ज मिळवण्यासाठी असा सिबिल स्कोर असणे अनिवार्य आहे असे आरबीआयने कुठेही म्हटलेले नाही. परंतु सध्या जर आपण बघितले तर कर्ज मिळण्याच्या बाबतीत सिबिल म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो खूप लोकप्रिय झाले असून हा स्कोर चांगला असेल तरच व्यक्तीला कर्ज मिळू शकते. परंतु सरकारने आरबीआयच्या नियमांबद्दल जो काही खुलासा केलेला आहे त्या माध्यमातून तरी असे दिसून येते की आता कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर हा निकष असणार नाही.