GST Rate: केंद्र सरकारने जीएसटी केला कमी! पण ‘या’ गोष्टी होणार महाग… तुम्हाला बसेल आर्थिक फटका?

Published on -

GST Rate:- स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करताना लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की येणाऱ्या सणासुदीच्या कालावधीमध्ये जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी केला जाणार व त्यानुसार सध्या पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त होण्यास मदत होणार आहे. परंतु यामध्ये मात्र ज्या वस्तूंमुळे आरोग्याला अपाय होऊ शकतो आणि ज्या लक्झरी म्हणजेच ऐषारामी कॅटेगरीमध्ये येतात अशा वस्तूंवर मात्र आता तेच 40% जीएसटी लावला जाणार आहे. या बदलाच्या आधी या वस्तूंवर 28% जीएसटी आकारला जात होता व त्यावर अतिरिक्त सेस देखील लागू करण्यात आलेला होता. सरकारने जे काही आता जीएसटी अंतर्गत नवी कर रचना जाहीर केली आहे व ती 22 सप्टेंबर 2025 पासून लागू केली जाणार आहे.

या वस्तूंवर लागू होणार वाढीव जीएसटी

या नवीन करांच्या नियमांतर्गत बघितले तर सिगारेट, सिगार, गुटखा, बिडी, फ्लेवर्ड आणि कार्बोनेटेड पेय, सुगंधी तंबाखू आणि पान मसाला सारखे आरोग्याला अपायकारक असलेल्या वस्तूंवर आता जास्त कर आकारला जाणार आहे. तसे पाहायला गेले तर जगातील बहुतेक देशांमध्ये या प्रकारच्या वस्तूंवर जास्तीचा कर आकारला जातो. जेणेकरून या वस्तूंचा वापर कमी व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. या वस्तूंवर जो काही जास्तीचा कर आकारला गेला आहे त्यावर सरकारने स्पष्टीकरण दिले आहे की हा नवीन करदर हा लोकांच्या हितासाठी आणण्यात आला आहे.

कारण या वस्तूंचा वापर हा वैयक्तिक आरोग्यासाठी घातक तर आहेच परंतु समाजासाठी देखील एक घातक आहे. त्यामुळे या नवीन कर रचनेअंतर्गत आता यावर जास्त कर आकारून जेणेकरून अशा सर्वांपासून लोकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.परंतु सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सरकारने स्पष्ट केले आहे दारूवर हा कर लागू राहणार नाही. ज्याप्रमाणे अगोदर दारू जीएसटीच्या कक्षेबाहेर होती. त्याच पद्धतीने आता देखील दारू जीएसटीचे कक्षेबाहेर राहणार आहे व त्यावर मात्र राज्य सरकारचा उत्पादन शुल्क लागू राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe