Post Office Scheme:- मुलांचे भविष्य आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध होण्याकरिता प्रत्येक पालक काळजी करत असतात व त्या दृष्टिकोनातून आर्थिक प्लॅनिंग देखील करतात. जेव्हा मुलं लहान असतात तेव्हापासूनच जर त्यांच्या भविष्यकालीन आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठीचे नियोजन केले तर नक्कीच याचा खूप मोठा फायदा होतो. याकरिता बँक आणि पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक फायद्याच्या अशा योजना राबवल्या जातात व या योजनांमध्ये जर गुंतवणूक केली तर काही वर्षांनी यामध्ये लाखो रुपयांचा निधी व्यक्तीला जमा करता येणे शक्य आहे. चला तर मग या लेखात आपण पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या अशाच एका योजनेबद्दल माहिती बघणार आहोत जे मुलीच्या आर्थिक भविष्यासाठी खूप फायद्याची अशी योजना आहे.
सुकन्या समृद्धी योजना आहे फायद्याची
मुलीच्या समृद्ध आर्थिक भविष्यासाठी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवण्यात येणारी सुकन्या समृद्धी योजना ही अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेमध्ये जर गुंतवणूक केले तर या योजनेतून सध्या गुंतवणुकीवर 8.2% व्याजदर दिला जात आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे ही योजना संपूर्णपणे करमुक्त योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात. या योजनेमध्ये जर मुलीच्या नावाने गुंतवणूक सुरू केली तर मुलीचे लग्न तसेच तिचे शिक्षण याचा संपूर्ण खर्च करता येणे शक्य होते. वर्षाला किमान 250 रुपयापासून ते जास्तीत जास्त दीड लाख रुपया पर्यंतचे गुंतवणूक यामध्ये करता येते. तसेच एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींचे खाते या योजनेत उघडता येते. जर जुळ्या मुली असतील तर तीन मुलींसाठी या योजनेत खाते उघडण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे. यामध्ये जर तुम्ही खाते उघडले तर पुढील पंधरा वर्षापर्यंत तुम्ही यामध्ये पैसा जमा करू शकतात.

एका आर्थिक वर्षामध्ये जर तुम्ही कमीत कमी 250 रुपये या योजनेत जमा केले नाहीत तर या योजनेचे खाते डिफॉल्ट होते. पण पुढील पंधरा वर्षाच्या आत तुम्ही त्यावरील दंड भरला तर ते खाते पुन्हा सुरू करता येते. तसेच मुलगी 18 वर्षाची होत नाही तोपर्यंत तिचे पालक हे खाते चालवू शकतात व मुलगी 18 वर्षाची झाल्यावर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर या योजनेच्या खात्यातील काही प्रमाणात पैसे काढता येतात. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडल्याच्या तारखेपासून साधारणपणे 21 वर्षांनी या योजनेची मुदत पूर्ण होते. पण महत्त्वाचे म्हणजे या योजनेत तुम्हाला फक्त पंधरा वर्षांपर्यंत पैसे भरावे लागतात. मुलीचे वय जर 18 वर्षे पूर्ण झाले तर तिच्या लग्नाच्या वेळी या खात्याची मुदतपूर्ती करता येऊ शकते.
70 लाखांपर्यंतचा प्रवास कसा पूर्ण कराल?
तुम्हाला जर या योजनेतून तुमच्या मुलीसाठी 70 लाख रुपयांचा निधी जमा करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक नियोजनबद्ध प्लॅनिंग करावे लागेल. समजा तुमच्या मुलीचे वय जर पाच वर्षे असेल व त्यावेळी तुम्ही या योजनेमध्ये खाते उघडले तर तुम्हाला पुढील पंधरा वर्षांपर्यंत वर्षाला दीड लाख रुपये यामध्ये जमा करणे गरजेचे आहे. जेव्हा 21 वर्षे पूर्ण झाल्यावर या योजनेची मुदत संपेल तेव्हा मुलीच्या खात्यात एकूण गुंतवणूक आणि त्यावर मिळणारे व्याज असे 69 लाख 27 हजार 578 रुपये जमा होतील. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 22 लाख 50 हजार रुपये जमा होते व त्यातून 46 लाख 77 हजार 578 रुपये व्याज मिळते.