Investment Scheme:- गुंतवणुकीची सुरक्षितता आणि चांगला परतावा या दृष्टिकोनातून बँकांच्या एफडी योजना आणि पोस्ट ऑफिसच्या एफडी आणि अनेक छोट्या बचत योजना अतिशय फायद्याच्या आहेत. या योजनांमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुमची गुंतवणूक सुरक्षित राहतेस परंतु तुम्हाला निश्चित परतावा देखील मिळतो. मुलांचे शिक्षण तसेच स्वतःच्या आर्थिक समृद्ध भविष्यासाठी अशा योजनांमध्ये गुंतवणूक करणे अतिशय फायद्याचे ठरते. सध्या जर आपण बघितले तर बऱ्याच प्रमाणामध्ये गुंतवणूकदार पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील अनेक उत्तम अशा योजना राबविण्यात येत असून गुंतवणूकदारांना उत्तम असा परतावा या योजनांच्या माध्यमातून मिळवणे शक्य झालेले आहे. अशाच एका महत्त्वाच्या योजनेची माहिती या लेखात आपण बघणार आहोत जी तुम्हाला एकदाच गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवून देण्यास सक्षम आहे.
पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना
पोस्ट ऑफिसची मुदत ठेव म्हणजेच एफडी योजना ही अतिशय फायद्याची अशी योजना आहे. या योजनेत तुम्ही प्रत्येक वर्षाला एकरकमी रक्कम जमा करू शकता व त्यावर व्याज मिळवू शकतात. ही सरकारी योजना असून यामधील गुंतवणूक देखील सुरक्षित राहते. सध्या पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेमध्ये जर पाच वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली तर 7.5 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे व हा व्याजाचा दर बँकांपेक्षा अधिक असल्याचे आपल्याला दिसून येते. या योजनेत तुम्ही जर पाच लाख रुपयांची एफडी केली तर पंधरा लाख रुपये मिळवू शकतात.

5 लाखाचे कसे मिळतील 15 लाख?
तुम्ही जर पाच लाख रुपये पोस्ट ऑफिसच्या या मुदत ठेव म्हणजेच एफडी योजनेत पाच वर्षासाठी एकरकमी गुंतवले तर तुम्हाला वर्षाला 7.5 टक्के इतके व्याज मिळेल. 5 वर्षानंतर तुमची एकूण गुंतवणूक सात लाख 24 हजार 974 रुपये होते. परंतु याही पुढे जात तुम्ही हे पैसे त्याच योजनेत पुन्हा पाच वर्षासाठी गुंतवले तर ती एकूण रक्कम तुम्हाला पुढील पाच वर्षात दहा लाख 51 हजार 575 रुपये इतकी मिळेल. परत तुम्ही जर पाच वर्षासाठी यामध्ये ही संपूर्ण रक्कम गुंतवली तर तुम्हाला एकूण 15 लाख 24 हजार 149 रुपये मिळू शकतात. म्हणजेच पाच लाखांची रक्कम पंधरा वर्षांमध्ये तीन पट वाढते. सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे या योजनेत जर तुम्ही एकदा पाच लाख रुपये जमा केले आणि पंधरा वर्षे ते काढले नाहीत तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला कुठलाही हप्ता भरावा लागत नाही व कुठल्याही प्रकारची जोखीम देखील घ्यायची गरज नाही. तुम्हाला पंधरा वर्षानंतर पंधरा लाख रुपयांपेक्षा जास्त परतावा या माध्यमातून मिळतो.