Cotton News: तुम्हालाही तुमच्या कापसाला मिळवायचा 8110 रुपयाचा हमीभाव? तर ‘हे’ काम करा…

Published on -

Cotton News:- एकंदरीत महाराष्ट्राचा विचार केला तर खरीप हंगामामधील प्रमुख पिक म्हणून कापूस आणि सोयाबीन याकडे पाहिले जाते. त्यातल्या त्यात कापसाचा विचार केला तर महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते. गेल्या एक ते दोन वर्षापासून बघितले तर कापसाला खूप कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसल्याचे आपल्याला दिसून आले. प्रत्येक वर्षाला सरकारच्या माध्यमातून इतर पिकांसोबतच कापसासाठी देखील हमीभाव जाहीर केला जातो. परंतु याचा लाभ मात्र शेतकऱ्यांना बऱ्याचदा मिळत नाही व खाजगी व्यापारी मात्र हमीभावापेक्षा देखील कमी दराने कापसाची खरेदी करत असल्याचे आपल्याला दिसून येते. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील केंद्र सरकारने कापसाकरिता 8110 रुपयाचा हमीभाव जाहीर केलेला आहे. त्यामुळे या हमीभावाचा शेतकऱ्यांना फायदा मिळणे व त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी देखील प्रयत्न करणे तितकेच गरजेचे आहे. चला तर मग या लेखात बघू की शेतकऱ्यांना या हमीभावाचा फायदा कशा पद्धतीने घेता येऊ शकतो.

“कपास किसान अँप”वर नोंदणी करणे ठरेल फायद्याचे

यावर्षे देखील महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड झाली असून साधारणपणे येत्या ऑक्टोबर महिन्यापासून बाजारामध्ये कापूस विक्रीसाठी दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु केंद्र सरकारने मात्र कापसावरील आयात शुल्क कमी केल्याने याचा विपरीत परिणाम हा कापसाच्या भावावर होण्याची शक्यता आहे व यामुळे भाव कमी होऊ शकतात अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. तसेच यंदाच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने कापसाला प्रति क्विंटल आठ हजार एकशे दहा रुपयाचा हमीभाव जाहीर केलेला आहे. या हमीभावाचा फायदा शेतकऱ्यांना सरकारच्या सीसीआय केंद्रावर कापूस विकल्यानंतरच मिळू शकणार आहे. यावर्षी आठ हजार एकशे दहा रुपयांचा हमीभाव असल्यामुळे सीसीआयच्या केंद्रावर कापसाची आवक वाढेल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कापूस विक्रीकरिता सीसीआयने कपास किसान ॲपवर कापसाची नोंदणी करणे सक्तीचे केलेले आहे व ही नोंदणी 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरून करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत कापसाची नोंदणी या ॲपवर करून घेणे गरजेचे ठरणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना सीसीआय केंद्रावर कापूस विकून सरकारच्या हमीभावाचा फायदा मिळवता येणार आहे.

कशी करता येईल नोंदणी?

सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअरवर जाऊन त्या ठिकाणहून कपास किसान ॲप डाऊनलोड करावे लागेल. हे एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर ते उघडून त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल व तो ओटीपी टाकून तुम्हाला व्हेरीफाय करावे लागेल व नंतर लॉगिन प्रक्रिया झाल्यावर फार्मर रजिस्ट्रेशन हा पर्याय तुम्हाला दिसेल. या पर्यायांमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारची वैयक्तिक माहिती भरावी लागेल व जी काही आवश्यक माहिती विचारली आहे ती सगळी भरून तुम्हाला नोंदणी करता येणार आहे व अशाप्रकारे तुम्ही हमीभावाचा फायदा घेऊ शकणार आहात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe