SIP Calculator: प्रतिमाह 5000 रुपयांची 15 वर्षे एसआयपीत गुंतवणूक केली तर किती पैसे मिळतील? समजून घ्या फायद्याचे गणित

Published on -

SIP Calculator:- येणारा भविष्यकाळ हा आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध राहावा याकरिता अनेकजण वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणुकीच्या दृष्टीने बघितले तर सध्या शेअर मार्केटमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे आपल्याला दिसून येते. परंतु या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर जोखीम असल्यामुळे पैसे बुडण्याचा मोठ्या प्रमाणावर धोका असतो. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांना जोखीम घ्यायची नसते ते म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. एसआयपीतील गुंतवणूक ही अतिशय फायद्याची असते व यामध्ये जोखीम देखील कमीत कमी असते व परतावा देखील चांगला मिळतो. अशा पद्धतीने तुम्हाला देखील महिन्याला पाच हजार रुपयांची पंधरा वर्षापर्यंत एसआयपीत गुंतवणूक करायचे असेल तर किती पैसा जमा होऊ शकतो? याचे सोपे गणित आपण अतिशय सहज आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

महिन्याला 5 हजाराची 15 वर्षासाठी एसआयपी केली तर किती निधी मिळेल?

समजा तुम्ही महिन्याला पाच हजार रुपये पंधरा वर्षांसाठी एसआयपीमध्ये गुंतवायचे ठरवले आणि या गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक 12 टक्क्यांचा सरासरी परतावा मिळाला तर पंधरा वर्षात तुमचे एकूण 23.79 लाख रुपयांचा निधी जमा होऊ शकतो. तुमची एकूण गुंतवणूक नऊ लाख रुपये जमा होते व तुम्हाला 14.79 लाख रुपये अपेक्षित परतावा या माध्यमातून मिळू शकतो. त्यामधील तुमची एकूण गुंतवणूक आणि मिळणारा अपेक्षित परतावा तुम्हाला पंधरा वर्षात 23.79 लाख रुपये मिळू शकतो.

पंधरा टक्के परतावा मिळाला तर

समजा तुम्हाला बारा टक्क्यांऐवजी वार्षिक सरासरी 15 टक्क्यांचा परतावा मिळाला तर महिन्याला पाच हजार रुपयांच्या पंधरा वर्षांच्या एसआयपीच्या माध्यमातून तुम्हाला 29.81 लाख रुपयांचा फंड मिळू शकतो. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक नऊ लाख रुपये होते व 15 टक्के परताव्याने तुम्हाला 21.89 लाख रुपये अपेक्षित परतावा मिळू शकतो. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक आणि अपेक्षित मिळणारा परतावा असे मिळून एकूण 30.81 लाख रुपये मिळू शकतात. परंतु यामध्ये गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावे की म्युच्युअल फंड मधील परतावा देखील बऱ्याचदा निश्चित नुसतं व त्यामध्ये चढ-उतार होत असतात. तसेच तुम्ही कुठल्या योजनेची निवड केलेली आहे यावर देखील अंतिम परतावा हा अवलंबून असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News