Multibagger Stock: 100 रुपयापेक्षा स्वस्त आहे ‘या’ कंपनीचा शेअर! 3 वर्षात दिला 532% चा रिटर्न…बघा फायद्याची अपडेट

Published on -

Multibagger Stock:- शेअर मार्केटची जर आपण गेल्या काही दिवसांची स्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणावर चढउतार असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. या आठवड्यामध्ये तर बरेचदा आपल्याला शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळाली. परंतु या घसरणीमध्ये देखील अनेक कंपन्यांचे शेअर्स मात्र वधारल्याचे दिसले व घसरणीमध्ये देखील गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक लाभ झाला. हे सगळ्या परिस्थितीत जर आपण डीएमआर हायड्रो इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा शेअर बघितला तर हा सर्वाधिक फोकसमध्ये असल्याचे दिसून आले. या कंपनीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या कंपनीने आठ बोनस शेअर्स देखील दिले आहेत. सध्या या कंपनीच्या बाबतीत बघितले तर एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेली आहे व ही अपडेट या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी किंवा गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे.

डीएमआर हायड्रो इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला मिळाला मोठा प्रोजेक्ट

डीएमआर हायड्रो इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड एक महत्त्वाची कंपनी असून या कंपनीने आपल्या भागधारकांना आठ बोनस शेअर्स दिलेले आहेत व सध्या या कंपनीला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार बघितले तर कंपनीला तीन कोटी रुपयांचे काम मिळाले असून या बद्दलची माहिती 5 सप्टेंबर 2025 रोजी कंपनीने दिलेली आहे. या प्रोजेक्टबद्दल शेअर बाजारांना माहिती देताना कंपनीने म्हटली की तिला कमलांग स्मॉल हायड्रो पॉवर प्रोजेक्टमध्ये इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी सर्विसेसचे काम मिळाले असून हे काम कंपनीला 36 महिन्यात पूर्ण करायचे आहे. या प्रोजेक्टचे एकूण मूल्य हे तीन कोटी रुपये इतके आहे.

कंपनीच्या शेअरचा एक वर्षाचा परफॉर्मन्स

या कंपनीचा गेल्या सहा महिन्यातील शेअर च्या किमती बघितल्या तर त्यामध्ये 12% पेक्षा जास्त वाढ दिसून आलेली असून एक वर्षात मात्र 17% ची घसरण या शेअरमध्ये पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअरमध्ये घसरण म्हणजेच लोअर सर्किट पाहायला मिळाले व यामध्ये पाच टक्क्यांची घसरण झाली. त्या घसरणीनंतर बीएसई वर 54.52 रुपयांवर हा शेअर ट्रेड करत होता. परंतु 52 आठवड्यांचा परफॉर्मन्स बघितला तर याची किमान किंमत 80.27 रुपये तर कमीत कमी किंमत 41.97 रुपये इतकी राहिलेली आहे. सध्या या कंपनीच्या मार्केट कॅप 56.23 कोटी रुपये इतकी आहे. परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये या शेअरमध्ये तब्बल 102 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे व तीन वर्षात 537 टक्के इतकी मोठी वाढ झालेली आहे. मागच्या वर्षे बघितले तर या कंपनीच्या शेअर्समध्ये एक्स बोनस ट्रेडिंग झाले होते व तेव्हा कंपनीने पाच शेअर्स वर आठ बोनस शेअर दिले व इतकेच नाही तर गेल्या महिन्यात एक्स डिव्हीडंड ट्रेडिंग करून या कंपनीने एका शेअरवर तेरा पैशांचा डिव्हीडंड म्हणजेच लाभांश दिलेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News