Bajaj Auto Share Price:- 8 सप्टेंबर 2025 वार सोमवार हा शेअर मार्केटसाठी अनुकूल दिवस ठरताना दिसून येत असून आतापर्यंतची आकडेवारी बघितली तर बाजाराने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. सध्या बीएसई सेन्सेक्स 301.42 अंकांच्या वाढीसह 81011.32 वर पोहोचला आहे. तर निफ्टी 50 मध्ये देखील चांगली वाढ होऊन निफ्टी सध्या 92.40 अंकांच्या वाढीसह 24830.35 वर पोहोचला आहे. इतकेच नाहीतर निफ्टी बँक या निर्देशांकामध्ये 143.25 अंकांची वाढ होऊन सध्या 54257.40 वर व्यवहार करत आहे. तसेच निफ्टी आयटीमध्ये देखील 59.90 अंकांची वाढ होऊन 34695.60 अंकांवर ट्रेड करत आहे.या सगळ्या सकारात्मक परिस्थितीमध्ये बजाज ऑटोच्या शेअरने देखील जोरदार मुसंडी घेतली असून त्यामध्ये 119.00 अंकांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे व हा शेअर सध्या 9203.50 रुपयांवर ट्रेड करत आहे.
बजाज ऑटोच्या शेअरची कामगिरी कशी राहिली?
आज आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे सोमवार असून आज जेव्हा मार्केट सुरू झाले तेव्हा बजाज ऑटोच्या शेअरची सुरुवातीची किंमत 9230.00 रुपये होती. सध्या हा शेअर्स 119 अंकांच्या वाढीसह 9203.50 रुपयांवर ट्रेड करत आहे. आतापर्यंत मार्केटच्या परिस्थितीनुसार जर बघितले तर या शेअरची निचांकी पातळी 9073 रुपये राहिली तर उच्चांकी पातळी 9230 इतकी राहिल्याचे दिसून आले. त्यासोबतच 52 आठवड्यांची कामगिरी बघितली तर उच्चांकी पातळी 12774 रुपये तर नीचांकी पातळी 7089.35 रुपये इतकी राहिली आहे.

बजाज ऑटो शेअर्सने गुंतवणूकदारांना दिलेल्या परतावा
ज्या गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये एक वर्ष कालावधी करिता गुंतवणूक केली असेल त्यांना -16.21% इतका परतावा दिला आहे तर सहा महिन्याच्या गुंतवणुकीवर +19.81%, ज्या गुंतवणूकदारांनी तीन महिने गुंतवणूक केली तर त्यांना +5.07% परतावा दिला आहे.तर एक महिन्याच्या कालावधीसाठी ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली त्यांना +10.28% इतका परतावा मिळाला आहे.