Ration Card: आता घरबसल्या काढा मोफत नवीन रेशनकार्ड! वापरा ‘या’ स्टेप…एका क्लिकवर वाचा A टू Z माहिती

Published on -

Ration Card:- भारतीय नागरिकांसाठी शासकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या कागदपत्रांच्या यादीमध्ये रेशन कार्डचे नाव देखील अग्रक्रमाने घेतले जाते. रेशन कार्डचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे स्वस्त धान्य दुकानावर जे काही मोफत रेशनचा म्हणजेच धान्याचा लाभ मिळतो त्याकरिता रेशन कार्ड आवश्यक असते. तसेच विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील रेशन कार्ड महत्वाचे मानले जाते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाकडे रेशनकार्ड असणे गरजेचे आहे. बऱ्याच कुटुंबामध्ये रेशन कार्ड नसते किंवा जेव्हा कुटुंब विभक्त होते तेव्हा मुलांना नवीन रेशन कार्ड काढावे लागते. अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील नवीन रेशन कार्ड काढायचे असेल तर आता कुठेही जाण्याची गरज नसून तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. चला तर मग या लेखात आपण बघू की तुम्ही घरबसल्या रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करावा?

नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज

1- तुम्हाला जर नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला rcms.mahafood.gov.in या वेबसाईटवर जाणे गरजेचे असते.

2- या वेबसाईटवर केल्यानंतर तुम्हाला साइन इन/ रजिस्टर या पर्यायावर जावे लागेल व या पर्यायावर गेल्यानंतर तुम्हाला पब्लिक लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करणे गरजेचे राहील.

3- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर न्यू युजर साइन अप हियर या पर्यायावर क्लिक करावे व त्यानंतर आय वॉन्ट टू अप्लाय न्यू रेशन कार्ड या पर्यायाला सिलेक्ट करावे.

4- या ठिकाणी जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुमची वैयक्तिक माहिती भरण्याकरिता एक नवा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल व त्यामध्ये तुम्ही सर्व तुमची माहिती व्यवस्थित भरावी. यामध्ये प्रामुख्याने अर्जदाराचे नाव तसेच आधार क्रमांक, लिंग, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल ऍड्रेस व्यवस्थितरित्या भरून घ्यावा. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे अगोदर तुम्हाला तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड हा क्रिएट करावा लागतो.

5- अशाप्रकारे संपूर्ण माहिती भरल्यानंतर समोर दिसत असलेला कॅपच्या कोड व्यवस्थितरित्या भरावा व गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करावे. ओटीपी आल्यानंतर तो टाकावा आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे.

6- ही सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रमाच्या वेबसाईटवर तुमचे खाते उघडले जाते.

7- अशाप्रकारे खाते उघडल्यानंतर पुन्हा एकदा लॉगिन या पर्यायावर जावे व रजिस्टर वर क्लिक करायचे असते व त्या ठिकाणी क्लिक करून लॉगिन व पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यावे.

8- त्यानंतर एप्लीकेशन रिक्वेस्टमध्ये अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड हा पर्याय तुम्हाला दिसेल व त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही नव्या रेशन कार्डसाठी संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी व याकरिता जी कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेली असतील ती अपलोड करावेत.

9- अशा पद्धतीने तुम्ही नवीन रेशन कार्डसाठी पात्र असाल तर तुम्हाला नवीन रेशन कार्ड मिळून जाते.

यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, मतदान कार्ड तसेच पासपोर्ट यापैकी एक कागदपत्र ओळखपत्र म्हणून लागते. तसेच टेलिफोन बिल, विज बिल, वोटर आयडी आणि पासपोर्ट यापैकी एक कागदपत्र रहिवासी प्रमाणपत्र म्हणून द्यावे लागते व त्यासोबतच कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, स्वयंघोषणापत्र आणि चौकशी अहवाल इत्यादी कागदपत्रे तुम्हाला या अर्जासोबत अपलोड करावी लागतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe