GST Rule Change : सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आजची बातमी फारच महत्वाची ठरणार आहे. खरे तर अलीकडेच केंद्रातील मोदी सरकारने जीएसटी दरात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जीएसटी रेट कमी होणार अशी घोषणा केली होती.
यानुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच संपन्न झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत GST कपातीची घोषणा केली आहे. सरकारने अनेक अत्यावश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी केला आहे.

काही जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी थेट शून्य करण्यात आला आहे तर कृषी यंत्रांवरील जीएसटी पाच टक्क्यांवर आणला गेला आहे. मोटरसायकल आणि छोट्या कार वरील जीएसटी सुद्धा कमी करण्यात आला आहे.
अशा स्थितीत अनेकांच्या माध्यमातून सोन्यावरील जीएसटी मध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे की नाही? जीएसटी मध्ये कपात झाल्यानंतर सोन्याचे रेट कमी होतील का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान आज आपण याच संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत.
केंद्रातील सरकारने जीएसटीचे दोन स्लॅब रद्द केलेत. 12 टक्के आणि 28 टक्के हे दोन स्लॅब सरकारने रद्द केले आहेत. आता फक्त पाच टक्के आणि 18% हे दोन स्लॅब असतील. सोन्यावरील जीएसटी मात्र तसेच कायम ठेवण्यात आली आहे.
यामुळे सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांना नव्या निर्णयाचा कोणताच फायदा होणार नाही. खरंतर सोन्याचे दागिने खरेदी करताना ग्राहकांना दोनदा जीएसटी द्यावी लागते. सोन्यावर देखील जीएसटी द्यावी लागते आणि त्याच्या मेकिंग चार्जवर सुद्धा जीएसटी आकारली जाते.
खरे तर सोने व्यापाऱ्यांकडून मेकिंग चार्ज जीएसटी फ्री असायला हवे अशी मागणी केली जात आहे. पण सरकारने सोन्याच्या जीएसटी मध्ये कोणताच बदल केलेला नाही. जुन्या नियमानुसारच सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून जीएसटी वसूल केली जाणार आहे.
50000 च्या सोने खरेदीवर किती जीएसटी भरावा लागेल
सोन्याच्या किमतीवर खरेदीदारांना तीन टक्के जीएसटी द्यावा लागतो आणि मेकिंग चार्ज वर 5% GST द्यावा लागतो. आता जर एखाद्याने 50 हजाराचे दागिने खरेदी केले असेल आणि त्यासाठी पाच हजार रुपये मेकिंग चार्ज लागणार असेल तर सोन्यावर पंधराशे रुपयांची जीएसटी आणि मेकिंग चार्जवर 250 रुपयांची जीएसटी द्यावी लागणार आहे. अर्थात पन्नास हजाराचे सोने खरेदीवर ग्राहकांना 1750 रुपये जीएसटी द्यावी लागेल.